आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अभिनेत्री तेजश्री प्रधानचे करिअरमधील हे पहिले Photo Shoot पाहिले आहे का तुम्ही!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
'होणार सून मी ह्या घरची' या मालिकेतून जान्हवीच्या रुपात अभिनेत्री तेजश्री प्रधान घराघरांत पोहोचली. खरं पाहता या मालिकेनेच तेजश्रीला प्रसिद्धी मिळवून दिली. या मालिकेपूर्वी ती 'तुझे नी माझे घर श्रीमंतांचे' आणि 'लेक लाडकी या घरची' या मालिकांमध्ये झळकली होती. 2011-12च्या काळात तेजश्रीच्या करिअरची सुरुवात झाली. करिअरच्या अगदी सुरुवातीच्या काळात तेजश्रीने एक फोटोशूट करुन घेतले होते. प्रसिद्ध सेलिब्रिटी फोटोग्राफर अतुल शिधये यांनी तेजश्रीचे हे फोटोशूट केले होते.
 
नुकताच तेजश्रीने तिच्या पहिल्या फोटोशूटचा एक फोटो पोस्ट केला आहे. हा फोटो पोस्ट करताना तेजश्रीने लिहिले,  "See what I found.. an old but very dear to my heart pic #FirstEverPhotoShoot p.c. Atul Shidhaye #HappyLife." तेजश्रीचे हे फोटोशूट 2011 मधील आहे. 
 
फोटोग्राफर अतुल शिधये यांनी तेजश्रीसोबतच मराठी इंडस्ट्रीतील अनेक नावाजलेल्या सेलिब्रिटींचे पोर्टफोलियो शूट केले आहेत. शिवाय त्यांनी अनेक सिनेमांसाठीदेखील मेकअप आर्टिस्ट आणि फोटोग्राफर म्हणून काम केले आहे.
 
पाहुयात, अतुल शिधये यांच्या कॅमे-यात क्लिक झालेल्या तेजश्रीच्या पहिल्यावहिल्या फोटोशूटची ही खास झलक... 
बातम्या आणखी आहेत...