आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Marathi Actress Tejashri Pradhan Shooting For Film Oli Ki Suki

शशांक केतकर अमेरिकेत असताना काय करतेय तेजश्री? जाणून घ्या...

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(तेजश्री प्रधान आणि शशांक केतकरचा फोटो)
‘होणार सून मी ह्या घरची’चा श्री सध्या मुंबईत नाहीये. त्यामुळे मालिकेचेही काही शुटिंग होत नाहीये. अर्थातच बाकीच्यांना सुट्टी मिळालीय. मग श्रीची जान्हवी आहे कुठे सध्या?... खरं तर शशांक केतकर आणि तेजश्री प्रधानमध्ये सगळं काही अलबेल असतं, तर शशांक जसा सध्या बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या कार्यक्रमा निमीत्ताने अमेरिकेला गेलाय. आणि मस्त सुट्टी एन्जॉय करतोय. तशीच तेजश्रीनेही केली असती. पण आता मधु इथे आणि चंद्र तिथे अशी सगळी गोष्ट असल्याने दोघंही आपापल्या पध्दतीने आपल्या कार्यक्रमांची आखणी करतायत, असेच दिसतेय.
शशांक केतकर अमेरिकेत असल्याने ‘होणार सून मी..’चे शुटिंग बंद आहे. आणि याचा फायदा करून घेत तेजश्री पोहोचलीय, पुण्यात. सध्या ती तिच्या आगामी ‘ओली की सुकी’ या चित्रपटाचे शुटिंग पूण्यात करत आहे. आणि शुटिंगच्या दरम्यान तिला सेल्फी काढण्याचाही मोह अनावर झालाय, असंच तिने काढलेल्या फोटोंवरून दिसून येतेय.
फोटो पाहून कोणीही हा अंदाज बांधू शकेल की, शशांक आणि तेजश्रीमधली ‘सेल्फी काढणे’ ही गोष्ट कॉमन आहे. दोघेही कुठेही गेले की, त्या ठिकाणाचे आणि सोबत काम करत असलेल्या माणसांचे सेल्फी दोघांनाही काढायला आवडतात.
तेजश्रीने तिच्या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान सहकलाकारांचे जे फोटो काढलेत, त्यावरून एक गोष्ट मात्र स्पष्ट होते की, या चित्रपटामध्ये भरपूर मुलं आहेत. त्यामुळे आता या फिल्ममध्ये तेजश्री त्यांच्या ताईची भूमिका करतेय की, शिक्षीकेची की अजून कसली ते लवकरच स्पष्ट होईल. पण एकमात्र खरंय, की किमान तिला सूनबाईंच्या भूमिकेपासून काहीतरी वेगळं करायची संधी हा चित्रपट देतोय.
पूढील स्लाइडमध्ये पाहा, तेजश्रीचे तिच्या आगामी फिल्म 'ओली की सुकी'च्या सेटवरचे सेल्फी