आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Marathi Actress Tejashri Pradhan\'s Play In Nasik

जान्हवी झाल्यावर तेजश्री पहिल्यांदा येतेय नाशिकमध्ये, \'कार्टी काळजात घुसली\' नाटकाच्या प्रयोगाला

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वसंत सबनीस लिखीत आणि मंगेश कदम दिग्दर्शित ‘कार्टी काळजात घुसली’ हे नाटक येत्या ९ ऑगस्टला नाशिककरांच्या भेटीला येतंय. १८ एप्रिलला शुभारंभ झालेलं हे नाटक पहिल्यांदाच हया रविवारी नाशिकमध्ये सादर होणार आहे. हे प्रशांत दामले ह्यांचे कमबॅक नाटक आहेच. पण ‘जान्हवी’ झाल्यावर तेजश्री प्रधानचे हे नाटक असल्याने ह्या नाटकाबद्दल प्रेक्षकांमध्ये विशेष उत्सुकता आहे.
तेजश्री प्रधान सांगतेय, “नाटक सुरू झाल्यापासून मी पहिल्यांदाच नाशिकमध्ये पाऊल ठेवतेय. होणार सून मालिका सुरू झाल्यापासून खर तर, नाशिकमध्ये जाताच आले नाही. त्यामुळे आता नाशिकच्या चाहत्यांना भेटायला मी खूप उत्सुक आहे.”
१८ वर्षांपूर्वी घर सोडून गेलेल्या वडिलांना पाहण्याच्या इच्छेपोटी त्यांची मुलगी त्यांना शोधत सोलापूरहून मुंबईला येते. आणि सुरूवातीला वडिलांना नकोशी वाटणारी ही मुलगी दोन आठवड्यांच्या कालावधीतच वडिलांच्या काळजात कशी घुसते, त्याची ही कथा. कालिदास कान्हेरे (प्रशांत दामले) आणि कांचन (तेजश्री प्रधान) ह्यांच्या हळुवार नात्याची ही कथा, प्रेक्षकांच मनोरंजन करते.
काही वर्षांपूर्वी हे नाटक जेव्हा रंगभूमीवर आलं होतं. तेव्हा अभिनेत्री स्वाती चिटणीस कांचनच्या भूमिका साकारत होत्या. त्याविषयी तेजश्री प्रधान सांगते, “ हे नाटक करण्यापूर्वी मी यु-ट्युबवर स्वाती मावशीचं नाटक पाहिलं होतं. त्यानंतर तिला फोन करूनही सांगितलं होतं. की, मावशी तुझी भूमिका मी करतेय. स्वाती मावशी माझी खूप लाडकी अभिनेत्री आहे. त्यामुळे तिचा रोल करताना एक आनंद होत होता. मध्यंतरी स्वाती मावशीच्या ‘शेवग्याच्या शेंगा’ नाटकानंतर पाठोपाठ त्याच नाट्यगृहात जेव्हा आमचं नाटकं होतं. तेव्हा तिने ते नाटक संपूर्ण पाहिलंही होतं.आणि माझी पाठही थोपटली होती.”
आता हे नाटक नाशिकमध्ये सादर होणार आहे. तेजश्री पहिल्यांदाच नाशिकच्या रंगभूमीवर नाटक सादर करतेय. मात्र प्रशांत दामले ह्या अगोदर ‘एका लग्नाची गोष्ट’ नाटक घेऊन नाशिकला आले होते. ते सांगतात, “ एका वर्षानंतर मी नाशिकला जाणार आहे. आणि नाशिककर अतिशय दर्दी प्रेक्षक आहेत. त्यांचे वाचन चांगले असते. त्यांच्यामध्ये पेशन्सही खूप चांगला आहे. एकदा नाटक सादर करत असताना वीज गेली होती. पण प्रेक्षक पाऊणतास वीज येण्याची वाट पाहत शांत बसले. आणि वीज आल्यावर आम्ही नाटक सादर केल होते. त्यामुळे नाशिकला जाताना नेहमीच चांगले वाटते.”
पुढील स्लाइडमध्ये पाहा, तेजश्री आणि प्रशांत दामलेंच्या नाटकाचे फोटो