आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

B\'day : विदर्भाची सून आहे मराठीची आघाडीची अॅक्ट्रेस तेजस्विनी, नवरा आहे सॉफ्टवेअर इंजिनिअर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नववधूच्या रुपात तेजस्विनी अतिशय देखणी दिसली. - Divya Marathi
नववधूच्या रुपात तेजस्विनी अतिशय देखणी दिसली.
एन्टरटेन्मेंट डेस्कः मराठी सिनेसृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये गणली जाणारी अभिनेत्री म्हणजे तेजस्विनी पंडीत. तेजस्विनी आज आपला 31 वा वाढदिवस साजरा करत आहे. 23 मे 1986 रोजी पुण्यात तिचा जन्म झाला. पुण्याच्या सारस्वत ब्राह्मण कुटुंबातील रणजित पंडीत आणि अभिनेत्री ज्योती चांदेकर यांची कन्या असलेल्या तेजस्विनीने अल्पावधीतच सिनेसृष्टीत आघाडीचे स्थान मिळवले आहे. तिचे सुरुवातीचे शिक्षण पुण्यातच झाले. व्हॉलीबॉल आणि बास्केटबॉलची ती चाहती आहे. प्राण्यांविषयीचे तिचे प्रेम नेहमी मीडियासमोर येत असतं.
 
तेजस्विनीची आई ज्योती पंडीत यादेखील मराठी सिनेसृष्टीतील नामवंत अभिनेत्री आहेत. 2012 मध्ये तेजस्विनी भूषण बोपचेसह लग्नगाठीत अडकली. तेजस्विनीचे पती भूषण सॉफ्टवेअर इंजिनिअर आहेत. गोंदियातील प्रसिद्ध उद्योगपती रमेशकुमार रुपचंदची बोपचे आणि आशादेवी यांची तेजस्विनी सून आहे. 
 
आज तेजस्विनीच्या वाढदिवसाचे औचित्य साधत आम्ही तुम्हाला तिच्या लग्न आणि रिसेप्शनची खास छायाचित्रे दाखवत आहोत. तेजस्विनी आणि भूषण यांचे लग्न गोंदियात तर वेडिंग रिसेप्शन पुण्यात झाले होते. रिसेप्शनला मराठी सिनेसृष्टीतील अनेक कलाकारांनी उपस्थिती लावली होती. 
 
चला तर मग पुढील स्लाईड्समध्ये पाहा, कसा रंगला होता तेजस्विनी-भूषणचा लग्नसोहळा...
बातम्या आणखी आहेत...