Home »Bollywood »Marathi Cinekatta» Marathi Actress Trupti Bhoir Tie Knot With Music Compser T Satish Chakravarthy

'अगडबम' फेम तृप्ती भोईर चढली बोहल्यावर, दाक्षिणात्य संगीतकारासोबत बांधली लग्नगाठी

दिव्य मराठी वेब टीम | Jul 17, 2017, 13:10 PM IST

मुंबईः मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री आणि निर्माती तृप्ती भोईर अलीकडेच विवाहबद्ध झाली आहे. दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील संगीतकार टी सतीश चक्रवर्थी यांची तृप्तीने जोडीदाराच्या रुपात निवड केली आहे. चेन्नई येथील एवीएम मेना हॉल येथे तृप्ती आणि सतीश विवाहबद्ध झाले.
'अगडबम 2'मधून लवकरच येणार आहे तृप्ती प्रेक्षकांच्या भेटीला...
अभिनेत्रीसोबतच तृप्ती निर्माती आणि दिग्दर्शिका म्हणूनही नावारुपास आली आहे. अगडबम या सिनेमात तिने साकारलेली नाजुकाची भूमिका बरीच गाजली होती. आता लवकरच ती 'अगडबम 2' या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. विशेष म्हणजे या सिनेमात भूमिका करण्यासोबतच तृप्तीने याचे दिग्दर्शन आणि निर्मितीदेखील केली आहे. ‘तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवे’, ‘अगडबम’, ‘हॅलो जय हिंद’, ‘टुरिंग टॉकिज’ या सिनेमांचे तिने दिग्दर्शन आणि अभिनय केला आहे. शिवाय छोट्या पडद्यावरील ‘चार दिवस सासूचे’, ‘वादळवाट’ या मालिकांमध्ये आणि ‘इंद्राक्षी’, ‘सही रे सही’ या नाटकांमध्येही तिने काम केले आहे.

पुढे वाचा, ए. आर. रहमान यांच्यासोबत केलंय सतीश यांनी काम...

Next Article

Recommended