आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

B\'day: अॅक्टिंगला होता उषाताईंच्या आईचा विरोध, 20 वर्षे केली होती बँकेत नोकरी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
'माहेरची साडी' हा मराठी चित्रपट आणि 'पवित्र रिश्ता' या हिंदी मालिकेतील खाष्ट सासू म्हणून आपल्या अभिनयाची वेगळी छाप उमटवणा-या ज्येष्ठ अभिनेत्री म्हणजे उषा नाडकर्णी. उषाताईंचा आज वाढदिवस असून त्यांनी वयाची 71 वर्षे पूर्ण केली आहेत. 13 सप्टेंबर 1946 साली मुंबईत त्यांचा जन्म झाला. खाष्ट सासूसोबतच प्रेमळ आईचीही भूमिका त्यांनी विविध चित्रपटांमधून साकारली आहे. एक बिनधास्त आणि मोकळ्या मनाची आणि स्पष्टवक्ती अभिनेत्री म्हणून उषा नाडकर्णी यांना ओळखले जाते. चाळीस वर्षांहून अधिकचा काळ त्यांनी मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत, छोट्या पडद्यावर विविधांगी भूमिका वठवल्या आहेत.
 
उषाताईंच्या भावाचे झाले निधन...
उषा ताईंना एकुण चार बहीण भावंड. त्यांची एक बहीण बँकेत नोकरी करते. त्यांना एक भाऊ असून ते मुंबईत वास्तव्याला आहेत. उषाताईंना आणखी एक भाऊ होता. पण 1975 साली त्यांचे निधन झाले होते. उषाताईंच्या या भावाला संगीताची विशेष आवड होती. आजही भावाची आठवण झाल्यावर त्यांचे डोळे पाणावत असतात.  
 
आईंना पसंत नव्हते उषा यांचे अभिनय करणे..
उषा ताईंनी अभिनय करु नये, असे त्यांच्या आईचे म्हणणे होते. पण उषा ताईंना बालपणीच कलेची आवड निर्माण झाली. चौथ्या वर्गात असताना उषाताईंनी पहिल्यांदा मंचावर नृत्य सादर केले होते. मोठे झाल्यानंतर त्यांची अभिनयातील रुची अधिक वाढू लागली. एकदा तर उषाताईंच्या आईंनी रागात त्यांचे सामान घराबाहेर फेकून दिले होते. आईने घरातून हाकलून दिल्यानंतर उषाताई मैत्रिणीकडे राहायला गेल्या होत्या. पण नंतर त्यांचे वडील त्यांना समजावून घरी परत घेऊन आले होते.  उषाताईंनी स्वतः हा किस्सा छोट्या पडद्यावरील होम मिनिस्टर या कार्यक्रमात सांगितला होता.
 
आज उषा ताईंच्या वाढदिवसाचे औचित्य साधत जाणून घेऊयात, त्यांच्या खासगी आयुष्याविषयी...  उषा यांच्या आईने कशी दिली त्यांना अभिनय करण्याची परवानगी आणि यासह बरंच काही पुढील स्लाईड्सवर... 
बातम्या आणखी आहेत...