आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अर्जुनच्या 'डॅडी'मध्ये मराठमोळ्या वीणा जामकरने पडद्यामागे साकारली आहे ही खास भूमिका

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एंटरटेन्मेंट डेस्कः कुख्यात डॉन अरुण गवळीच्या आयुष्यावर तयार झालेला 'डॅडी' हा चित्रपट येत्या शुक्रवारी म्हणजे 8 सप्टेंबर रोजी रिलीज होतोय. या चित्रपटात अभिनेता अर्जुन रामपालने अरुण गवळीची भूमिका वठवली आहे. तर प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्री ऐश्वर्या राजेश ही अरुण गवळीची पत्नी आशा गवळीच्या भूमिकेत झळकणार आहे. आशा गवळी यांना 'मम्मी' म्हणून ओळखले जाते. आशा गवळी या लग्नापूर्वी मुस्लिम होत्या. अरुण गवळीसोबत लग्नानंतर त्यांनी हिंदू धर्माचा स्वीकार केला आणि नाव बदलून आशा असे ठेवले. अरुण आणि आशा गवळी यांना महेश गवळी आणि गीता गवळी ही दोन मुलं आहेत. डॅडीमध्ये आशा गवळीची भूमिका वठवणा-या ऐश्वर्याचा हा पहिलाच हिंदी चित्रपट असून तिने यापूर्वी 50 तामिळ चित्रपटांमध्ये भूमिका वठवल्या आहेत. 

मराठमोळ्या वीणा जामकरचा महत्त्वाचा सहभाग... 
या चित्रपटासाठी मराठमोळी अभिनेत्री वीणा जामकर हिने एक महत्त्वाची भूमिका वठवली आहे. वीणाने या चित्रपटात भूमिका साकारली की काय, असे तुम्हाला वाटत असेल तर तसे नाहीये. वीणाने पडद्यामागे एक महत्त्वाची भूमिका साकारली आहे. यात तिने ऐश्वर्यासाठी डबिंग केले आहे. म्हणजे पडद्यावर वीणाचा आवाज आपण ऐकू शकणार आहोत.

अर्जुनने केली वीणाची निवड... 
विशेष म्हणजे यासाठी अर्जुननेच वीणाची निवड केली आहे. पाच ते सहा दिवसांत वीणाने हे डबिंग पूर्ण केले. हा पाच ते सहा दिवसांचा अनुभव अतिशय सुखद असल्याचे वीणा सांगते. 

पुढे वाचा, मराठी चित्रपटसृष्टीतील सशक्त अभिनेत्री वीणा जामकर हिच्याविषयी सर्वकाही... 
बातम्या आणखी आहेत...