आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सेक्स वर्करच्या भूमिकेत झळकणार विभा देशपांडे, चित्रपटाचे पोस्टरही आहे तितकेच बोल्ड !

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नेहमी साध्या-सुध्या रुपात आपल्यासमोर येणारी मराठमोळी अभिनेत्री विभा देशपांडे आता बोल्ड रुपात प्रेक्षकांसमोर येणार आहे. टिकली अॅण्ड लक्ष्मी बॉम्ब या आगामी चित्रपटात विभा एका बिनधास्त सेक्स वर्करच्या भूमिकेत झळकणार आहे. हा चित्रपट आदित्य कृपलानीचे पुस्तक 'टिकली अॅण्ड लक्ष्मी बॉम्ब' या पुस्तकावरुन घेण्यात आले आहे. 

 

विभा देशपांडे आणि चित्रागंदा चक्रवर्ती यांनी या चित्रपटात लक्ष्मी आणि टिकली या दोन भूमिका केल्या आहेत. वेश्याव्यवयासातील पुरुषांचे असलेले अस्तित्व मोडून काढण्याचा वसा त्या उचलतात आणि त्याप्रकारे त्यांच्या आयुष्यात आणि इतरांच्या आयुष्यात काय काय बदल होतात अशी चित्रपटाची कथा आहे. 

 

विभाने या चित्रपटात लक्ष्मीची भूमिका केली आहे. आतापर्यंत केलेल्या भूमिकांमध्ये विभाने साकारलेली ही सर्वात बोल्ड भूमिका असेल. कवीमनाच्या असलेल्या लक्ष्मीला तिच्या नकळत वेश्याव्यवसायात ढकलले जाते. वेश्याव्यवसायातील पुरुषांची मक्तेदारी खोडून काढण्यासाठी लक्ष्मीने केलेला विचार आणि टिकलीची निर्भीडता हा चित्रपटाचा पाया असल्याचे विभाने सांगितले. 

 

सोशल मीडियावर विभाने तिच्या या आगामी प्रोजेक्टचे फोटो पोस्ट केले आहेत. अनेक मराठी कलाकारांनी विभाला तिच्या कामानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. 

 

पुढच्या स्लाईडवर पाहा, चित्रपटासंबंधित आणखी काही PHOTOS....

बातम्या आणखी आहेत...