आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विशाखा @ 40: एकेकाळी लिपस्टिक, साड्या विक्रीचे केले काम,पती आहेत इंजिनिअर-अभिनेते

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
डावीकडे- (वर) पती महेश सुभेदार यांच्यासोबत विशाखा, (खाली) - सुरुची अडाळकरसोबत आणि उजवीकडे (खाली) - का रे दुरावाच्या टीमसोबत विशाखा - Divya Marathi
डावीकडे- (वर) पती महेश सुभेदार यांच्यासोबत विशाखा, (खाली) - सुरुची अडाळकरसोबत आणि उजवीकडे (खाली) - का रे दुरावाच्या टीमसोबत विशाखा
एन्टरटेन्मेंट डेस्कः स्टॅण्ड अप कॉमेडी करणा-या मराठी कलाकारांपैकी एक प्रसिद्ध नाव म्हणजे अभिनेत्री विशाखा सुभेदार. 'फु बाई फु', ‘कॉमेडीची बुलेट ट्रेन’ या शोजमधून विशाखा यांनी आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांना खळखळून हसवले आहे. छोट्या आणि मोठ्या पडद्यावर आपल्या अभिनयाची छाप सोडणा-या विशाखा सध्या 'का रे दुरावा' या मालिकेतून आपल्या भेटीस येत आहेत. नंदिनी ही थोडीशी गंभीर छटेची भूमिका त्यांनी या मालिकेत साकारली आहे. आज विशाखा यांचा वाढदिवस असून त्यांनी वयाची 40 वर्षे पूर्ण केली आहेत. 22 मार्च 1976 रोजी जन्मलेल्या विशाखा यांचे लग्न अभिनेते महेश सुभेदार यांच्यासोबत झाले आहे. आज विशाखा यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत जाणून घेऊयात त्यांच्याविषयी बरंच काही...
ठाण्याची मुलगी झाली अंबरनाथची सून
विशाखा यांचे माहेरचे आडनाव शिंदे. विशाखा या मुळच्या ठाण्याच्या. कळवा येथे त्यांचे माहेर आहे. येथेच त्यांचे शिक्षण पूर्ण झाले. 1998 मध्ये अभिनेते आणि डबिंग आर्टिस्ट म्हणून प्रसिद्ध असलेले महेश सुभेदार यांच्यासोबत विशाखा यांचे लग्न झाले. महेश सुभेदार हे इंजिनिअरसुद्धा आहेत. लग्नानंतर त्या अंबरनाथला शिफ्ट झाल्या. विशेष म्हणजे लग्नानंतरच विशाखा यांना अभिनेत्री म्हणून ओळख प्राप्त झाली आहे. महेश आणि विशाखा यांचा एक मुलगा असून अभिनय हे त्याचे नाव आहे.
पुढे वाचा, अभिनेत्री होण्यापूर्वी केले सेल्समनचे काम आणि सोबतच बघा त्यांची खास छायाचित्रे...
बातम्या आणखी आहेत...