आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मराठी FILMFARE अवॉर्डच्या रेड कार्पेटवर आलिया-अनिल कपूर, मराठी सेलिब्रिटींनी लावले चारचाँद

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चित्रपटसृष्टी आणि प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी तत्पर असणाऱ्या कलाकारांसाठी पुरस्कार म्हणजे त्यांच्या कामाला मिळणारी एक शाबासकीची थापच असते. त्यातही काही पुरस्कार कलाकारांच्या जास्तच जवळचे. असाच एक पुरस्कार म्हणजे फिल्मफेअर. हिंदी चित्रपटसृष्टीत बऱ्याच वर्षांपासून चालत आलेल्या फिल्मफेअर पुरस्कारांना चित्रपटवर्तुळामध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे. गेल्या वर्षी मराठी चित्रपटांसाठीही मराठी फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. त्या सोहळ्याला मिळालेले यश आणि कालकारांचा उत्साह पाहता ही परंपरा अशीच सुरु राहिली आहे. 27 नोव्हेंबरच्या रात्री मुंबईतील रिलायन्स स्टुडिओमध्ये मोठ्या जल्लोषात दुसरा मराठी फिल्मफेअर पुरस्कार सोहळा पार पडला. (मराठी फिल्मफेअर अॅवॉर्ड 2016 च्या विजेत्यांची नावे जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा...)

या सोहळ्याच्या रेड कार्पेटवर मराठीसोबतच बॉलिवूडमधील तारे-तारकांची मांदियाळी बघायला मिळाली. बॉलिवूडमधून आलिया भट, सोनाली बेंद्रे, अनिल कपूर, सुशांत सिंह राजपूत, विवेक ओबरॉय यांनी विशेष हजेरी लावली होती. तर संपूर्ण मराठी इंडस्ट्री या सोहळ्याची साक्षीदार बनली. उर्मिला कानेटकर-कोठारे, अमृता खानविलकर, पूजा सावंत, सुबोध भावे, वैभव तत्त्ववादी, भूषण प्रधान, सचिन पिळगावकर, सुप्रिया पिळगावकर, नेहा पेंडसे, सोनाली कुलकर्णी (मोठी), नीना कुलकर्णी, शरद केळकर, शंकर महादेवन, स्पृहा जोशी, प्रार्थना बेहरेसह मराठी इंडस्ट्रीतील सेलिब्रिटींनी या सोहळ्याच्या रेड कार्पेटवर हजेरी लावली. यावेळी मराठी सेलिब्रिटींचा ग्लॅमरस लूक लक्षवेधी ठरला. मुख्यमंत्री देवेंद फडणवीस यांनीही या सोहळ्याला विशेष उपस्थिती लावली होती.

कर्म फिल्मफेअर अॅवॉर्डस मराठी 2016 च्या रेड कार्पेटवर अवतरलेल्या सेलिब्रिटींची खास झलक आम्ही तुम्हाला या पॅकेजमध्ये दाखवत आहोत. पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि बघा, रेड कार्पेटवर अवतरलेले तारांगण...
(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...