आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS : मराठी-बॉलिवूड स्टार्सच्या मांदियाळीत झाले सनी-बॉबीच्या \'पोस्टर बॉईज\'चे स्क्रिनिंग

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सचिन खेडेकर-दीप्ती तळपदे, सनी देओल, श्रेयस तळपदे, सोनाली कुलकर्णी आणि अर्शद वारसी - Divya Marathi
सचिन खेडेकर-दीप्ती तळपदे, सनी देओल, श्रेयस तळपदे, सोनाली कुलकर्णी आणि अर्शद वारसी
दिलीप प्रभावळकर, अनिकेत विश्वासराव, हृषीकेश जोशी स्टारर 'पोश्टर बॉईज' या गाजलेल्या मराठी चित्रपटाचा हिंदी रिमेक 'पोस्टर बॉईज' उद्या म्हणजे 8 सप्टेंबर रोजी थिएटरमध्ये दाखल होतोय. अभिनेता श्रेयस तळपदेची निर्मिती असलेल्या या चित्रपटात सनी देओल आणि बॉबी देओल मुख्य भूमिका साकारत आहेत. सोबतच श्रेयससुद्धा चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत आहे. बुधवारी मुंबईतील यशराज स्टुडिओत या चित्रपटाचे स्पेशल स्क्रिनिंग पार पडले. या स्क्रिनिंगला बॉलिवूडसोबतच मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक सेलिब्रिटींनी उपस्थिती लावली. 

सनी देओल, बॉबी देओल, श्रेयस तळपदे यांच्यासह मंजरी फडनीस, सचिन खेडेकर, श्रेयस तळपदेची पत्नी दीप्ती तळपदे, सोनाली कुलकर्णी यांनी हजेरी लावली होती. तर बॉलिवूडमधूनदेखील अनेक सेलिब्रिटी स्क्रिनिंगला पोहोचले होते. साजिद खान, सोहेल खानची पत्नी सीमा खान, अर्शद वारसी, निखिल द्विवेदी, कुणाल खेमू हे सेलिब्रिटी यावेळी दिसले. 

‘यमला पगला दीवाना 2’ या चित्रपटानंतर सनी आणि बॉबी देओल पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. समीर पाटील दिग्दर्शित आणि दिलीप प्रभावळकर, हृषिकेश जोशी आणि अनिकेत विश्वासराव या धमाल त्रिमूर्तीच्या ‘पोश्टर बॉईज’ने चांगलेच यश मिळवले होते. ग्रामीण भागात घडणाऱ्या या चित्रपटात नसबंदीवर केलेले हलकेफुलके भाष्य प्रेक्षकांच्याही पसंतीस पडले होते. सनी आणि बॉबी देओल यांच्या मुख्य भूमिका असणाऱ्या या चित्रपटामध्ये अभिनेत्री सोनाली कुलकर्णीसुद्धा झळकणार आहे. मराठी चित्रपट ‘पोश्टर बॉईज’चा रिमेक असणारा हा आगामी चित्रपट प्रेक्षकांची मनं जिंकतो का…? हे आता लवकरच कळणार आहे. 

पाहुयात, पोस्टर बॉईजच्या स्क्रिनिंगला पोहोचलेल्या हिंदी-मराठी सेलिब्रिटीची खास झलक... 
बातम्या आणखी आहेत...