आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Marathi And Bollywood\'s Glamours Stars At First Marathi Filmfare Award Function

First मराठी Filmfare Awardsमध्ये मराठी आणि Bollywoodच्या Glamours Starsची मांदियाळी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पहिल्या मराठी फिल्मफेअर अवॉर्ड्ससाठी संपूर्ण मराठी फिल्मइंडस्ट्रीमध्ये गेल्या काही दिवसांपासून उत्सुकता होती. फिल्मफेअरचे हिंदी अवॉर्ड गेली साठ वर्ष जसे थाटात होतात, तसेच भव्य पध्दतीने मराठी अवॉर्ड फंक्शनही करण्याचा आयोजकांनी प्रयत्न केला.
रेड कार्पेटवर सुनील बर्वे, संस्कृती बालगुडे, आदिती सारंगधर, श्रृती मराठे, विजय पाटकर, संगीतकार चिनार आणि महेश, गायिका वैशाली सामंत, शर्वाणी पिल्ले, भरत दाभोळकर, अभिनय सावंत, वीणा जामकर, गायक सुदेश भोसले, प्रिया बापट, उमेश कामत, सई ताम्हणकर, रितेश देशमुख, अमृता खानविलकर, अनिकेत विश्वासराव, संदीप पाठक, हेमंत ढोमे, गिरीश कुलकर्णी, आदिनाथ कोठारे, उर्मिला कोठारे, रमेश देव, सीमा देव, अजिंक्य देव, शरद पोंक्षे, अश्विनी एकबोटे, निशिगंधा वाड, दिपक देऊळकर, चिन्मय मांडलेकर, सुकन्या कुलकर्णी, वर्षा उसगांवकर, रेणुका शहाणे, मकरंद देशपांडे, मानसी मोघे, इरावती हर्षे, शरद केळकर, सोनाली कुलकर्णी, नीना कुळकर्णी, सचिन आणि सुप्रिया पिळगांवकर आदी मराठी फिल्मइंडस्ट्रीचे स्टार्स दिसले.
तर तब्बू, उर्मिला मातोंडकर, विद्या बालन, वरुण धवन, आथिया शेट्टी, सूरज पांचोली यांसारख्या बॉलिवूडकरांची पहिल्या मराठी फिल्मफेअरला उपस्थिती होती.
सुरज पांचोलीला मराठीत बोलायची खूप इच्छा दिसली. पण ‘आता माझी सटकली’ ह्या वाक्याशिवाय तो काही मराठी शिकला नव्हता. अबु जानी –संदिप खोसलाच्या डिझाइन केलेल्या साडीत तब्बु आली होती.उर्मिला मातोंडकरने ‘शेवटी आलं बाबा फिल्मफेअर मराठीत’ अशा शब्दात रेड कार्पेटवर आल्या आल्या आपली भावना व्यक्त केली. टेम्पल ज्वेलरी, चंद्रकोर, पैठणी असा मराठमोळा साज लेवून विद्या बालन आली होती. वरूण आल्या आल्या रेड कार्पेटवर त्याला रितेश देशमुख भेटला, तेव्हा त्याने रितेशला ह्या पुरस्कारासाठी शुभेच्छा दिल्याच. पण तोच सर्वाधिक पुरस्कार जिंकावा अशी इच्छाही प्रकट केली. माधुरी दिक्षीत, श्रध्दा कपूरलाही कार्यक्रमाला बोलावलं होतं. मात्र दोघीही येऊ शकल्या नाहीत.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन पुष्कर श्रोत्री, प्रसाद ओक आणि क्रांती रेडकर ह्यांनी केले. सचिन पिळगांवकर, नेहा पेंडसे, अमृता खानविलकर, आदिनाथ कोठारे, सोनाली कुलकर्णी, आणि मानसी नाईकने झकास परफॉर्मन्स दिला.
सचिन पिळगांवकर ह्यांनी ८०च्या दशकातल्या हिंदी गाण्यावर परफॉर्मन्स दिला. तर वैशाली सामंतने ‘ऐका दाजिबा’ सारखी तिची उडत्या चालीतली फेमस गाणी गायली. आदिनाथ कोठारेच्या वॉरियर परफॉर्मन्स आणि मानसी नाईकचा रिक्षावाला परफॉर्मन्सने प्रेक्षकांची दाद मिळवली. मकरंद अनासपुरेच्या खुसखुशीत विनोदांमुळे कार्यक्रमाला रंगत आली.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, अवॉर्ड फंक्शनमध्ये आलेले ग्लॅमरस तारे