आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Marathi Box Cricket League 2015 Start In Panchgani

'मराठी बॉक्स क्रिकेट लीग'मध्ये मराठी सेलिब्रिटीजचे दहा संघ आमने सामने

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मराठी मनोरंजन विश्वात अनोख्या संकल्पना अलीकडच्या काळात पुढे येऊ लागल्या आहेत. या संकल्पनांना कलाकारांनीही मनापासून साथ दिली आहे. मराठी कलाकारांना कामाच्या व्यापातून मोकळा वेळ मिळून एकत्र येऊन धमाल मस्ती करता यावी यासाठी महाराष्ट्र कलानिधीने गेल्या वर्षीपासून ‘मराठी 'बॉक्स क्रिकेट लीग' (एमबीसीएल) ही भन्नाट संकल्पना मांडली आणि उत्तमरीत्या प्रत्यक्षातही उतरवली. गेल्यावर्षी या स्पर्धेचा मनमुराद आनंद सर्वांनीच0 लुटला.
यावर्षीही अशीच धमाल मस्ती अनुभवण्यासाठी मराठी सेलिब्रिटीज सज्ज झाले आहेत. येत्या 8,9,10 मे रोजी पाचगणीत ‘मराठी 'बॉक्स क्रिकेट लीग'चे सामने रंगणार आहेत.

130 कलाकार, 30 तंत्रज्ञ यांचे 10 तुल्यबळ संघ या तीन दिवसांत आपआपसात भिडणार आहेत. ‘मराठी 'बॉक्स क्रिकेट लीग' च्या दुसऱ्या पर्वाच्या निमित्ताने मराठी मनोरंजन विश्वातील 350 जणांची टीम पाचगणीत दाखल होत आहे. महाराष्ट्र कलानिधीचे श्री. नितेश राणे, श्री. सुशांत शेलार यांनी या आयोजनाची जबाबदारी सांभाळली असून त्यांचे 40 हून अधिक सहकारी या सामन्यांच्या नियोजनात गुंतले आहेत.

‘मराठी 'बॉक्स क्रिकेट लीग'च्या माध्यमातून ‘शिलेदार ठाणे’, ‘कोहिनूर नागपूर’, ‘डॅशिंग मुंबई’, ‘रत्नागिरी टायगर्स’, ‘शूर कोल्हापूर’, ‘मस्त पुणे’, ‘क्लासिक नाशिक’, ’फटाका औरंगाबाद’, ‘झी झुंजार’ व ‘अजिंक्यतारा सातारा’ हे दहा संघ क्रिकेटच्या मैदानात एकमेकांशी भिडणार आहेत. या सर्वच संघांनी जोरदार सरावही केला आहे. ‘किसमे कितना है दम’ असं म्हणत सारे संघ एकमेकांविरोधात उभे ठाकणार आहेत. यंदा कोणता संघ बाजी मारणार? याचे आडाखेही बांधले जाऊ लागले आहेत.

पाचगणीचं निसर्गसौंदर्य आणि कलाकारांच्या चौकार षट्कारांची जोरदार आतषबाजी असा दुहेरी धमाका यंदाच्या पर्वात पाहायला मिळणार आहे.