आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PARTY : मराठी बॉक्स क्रिकेट लीगची झाली विकेन्डला पार्टी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गेली दोन वर्ष मराठी सेलिब्रिटींसाठी बॉक्स क्रिकेट लीग आयोजित केली जातेय. MBCL च्या पहिल्या वर्षी ठाणे शिलेदार तर दुस-या र्षी रत्नागिरी टायगर्सनी बाजी मारल्यावर आता तिस-या वर्षी काय होणार ह्याकडे सर्वांचेच लक्ष लागलेय. पहिल्या वर्षी लवासा आणि दुस-या वर्षी पांचगणीला ही क्रिकेट लीग आयोजित केल्यावर आता यंदा MBCLचा तिसरा सिझन कोल्हापूरात होतोय. यंदा एक नवीन टीमही वाढलीय. ह्याच निमीत्ताने विकेन्डला कलाकरांनी मस्त पार्टी एन्जॉय केली.
MBCLच्या यंदाच्या वैशिष्ठ्याबद्दल सांगताना आयोजक सुशांत शेलार सांगतो, “ह्यावर्षी आम्ही क्रिकेटच्या आणि फिल्म इंडस्ट्रीच्या चाहत्यांना ही क्रिकेट लीग मैदानात बसून पाहता येण्याची संधी देतोय. कोल्हापूरच्या शाहू स्टेडियममध्ये ही क्रिकेट लीग होतेय. गेली दोन वर्ष विजेत्याला काही बक्षीस दिलं नव्हतं. यंदा मात्र अडीच लाखाचं बक्षीसही ठेवलंय. त्यामूळे आता खेळताना अजून मजा येणार आहे”
डॅशिंग मुंबई, ठाणे शिलेदार, रत्नागिरी टायगर्स, क्लासिक नासिक, फटाका औरंगाबाद, शूर कोल्हापूर, अजिंक्यातारा सातारा, मस्त पूणे, कोहीनूर नागपूर अशा नऊ टीम गेल्या वर्षी मराठी बॉक्स क्रिकेट लीगमध्ये होत्या. यंदा मात्र धडाकेबाज नवी मुंबई ही टीम वाढलीय. ह्याबद्दल सुशांत शेलार म्हणतो, “नवी मुंबईत बरेच सेलेब्स राहतात. जेवढ्या जास्त टीम वाढतात. तेवढी जास्त चुरस वाढते. त्यामुळे दर वर्षी अशा टीम वाढत गेल्या, तर खेळायला खूप मजा येणार आहे.”
पुढील स्लाइडमध्ये पाहा, कोण कोण सेलेब्स आले होते MBCL च्या पार्टीला
(फोटो - स्वप्निल चव्हाण)