(फाइल फोटोः अभिनेते मकरंद देशपांडे आणि अभिनेत्री वीणा जामकर)
महाराष्ट्रात 15 ऑक्टोबर रोजी विधानसभेसाठी मतदान होणार आहे. या निवडणूकीत प्रत्येकाने आपला मतदानाचा हक्क बजावला पाहिजे, असे आवाहन सेलिब्रिटींनी मतदारांना केले आहे. काय म्हणाताहेत मराठी आणि हिंदी सेलिब्रिटी जाणून घ्या...
वीणा जामकर, अभिनेत्री
''प्रत्येकाने मतदान करायला पाहिजे. राजकारण्यांनी रस्ते केले नाही, राज्यात वीज, पाणी नाही असा ओरडा करण्यापूर्वी प्रत्येकाने मत देऊन योग्य उमेदवार निवडणून आणायला पाहिजे. जर तुम्ही मतदान करत नसाल, तर तुम्हाला असा ओरडा करण्याचा हक्क नाही. जेव्हा आपल्या हातात चाबूक आहे, तेव्हाच तो चालवला पाहिजे. अर्थातच मतदान करणे आपल्या हातात आहे, तो हक्क आपण बजवायलाच पाहिजे.''
पुढील स्लाईड्समध्ये जाणून घ्या, मकरंद देशपांडे, सयाजी शिंदे, रेणु देसाई, आदिनाथ कोठारे, नंदू माधव, मोना सिंग, हे सेलिब्रिटी काय म्हणाले...