एन्टरटेन्मेंट डेस्कः उद्या सर्वत्र बाप्पाचे वाजतगाजत आगमन होणार आहे. सामान्यांप्रमाणेच मराठी सेलिब्रिटीसुद्धा गणेशाच्या भक्तीत लीन होऊन जातात. मोठ्या उत्साहात आणि भक्ती भावात सेलिब्रिटी आपल्या घरी लाडक्या बाप्पाचे स्वागत करत असतात. गणेशोत्सवाच्या काळात सर्व कलाकारांवर गणेश भक्तीत रंग चढलेला दिसून येतो. दरवर्षी अनेक मराठी सेलिब्रिटींच्या घरी बाप्पा विराजमान होतात. अनेक सेलिब्रिटी याकाळात आवर्जुन शूटिंगपासून सुटी घेतात. बाप्पासाठी घरी मोदक, पुरणपोळीचा नैवेद्य केला जातो. बाप्पासाठी सुंदर आरास तयार केली जाते. अनेक सेलिब्रिटींच्या घरी दीड आणि पाच दिवसांसाठी बाप्पा विराजमान होत असतात.
गेल्या वर्षी आदेश बांदेकर, शशांक केतकर, तेजस्विनी पंडीत, वैभव तत्त्ववादी, अभिजीत खांडकेकर, अमृता खानविलकर, केदार शिंदे, क्षिती जोग-हेमंत ढोमे, गानसम्राज्ञी लता मंगेशकर, क्रांती रेडकर, सुयश टिळक, स्नेहा वाघ, मकरंद अनासपुरे यांच्यासह अनेक सेलिब्रिटींच्या घरी बाप्पा पावणचारासाठी आले होते.
या पॅकेजमधून आम्ही तुम्हाला या सेलिब्रिटींच्या घरी गेल्या वर्षी विराजमान झालेल्या बाप्पाची खास छायाचित्रे दाखवत आहोत. पुढील स्लाईड्समध्ये पाहा गेल्यावर्षीचे मराठी सेलेब्सची गणपती सेलिब्रेशनची खास झलक...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)