आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मराठमोळी अमृता झाली पंजाबी घराण्याची सून, या 13 मराठी सेलेब्सनी केलं INTER CAST मॅरेज

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एन्टरटेन्मेंट डेस्कः मराठी सिनेसृष्टीची प्रसिद्ध अभिनेत्री अमृता खानविलकर हिचा आज वाढदिवस असून तिने वयाची 32 वर्षे पूर्ण केली आहेत. वाजले की बारा... या गाण्यामुळे प्रसिद्धीझोतात आलेल्या अमृताचा जन्म 23 नोव्हेंबर 1984 रोजी मुंबईत झाला. तिचे शालेय शिक्षण पुण्याच्या कर्नाटक हायस्कूल येथे झाले. तर महाविद्यालयीन शिक्षण मराठवाडा मित्रमंडळ कॉलेज ऑफ कॉमर्स महाविद्यालयात झाले. अमृताने मराठीसोबतच हिंदी सिनेमांमध्येही अभिनय केला आहे. शिवाय मराठी टेलिव्हिजनवर काही कार्यक्रमांमध्ये सूत्रसंचालनही केले आहे.

पंजाबी कुटुंबाची सून झाली अमृता...
अमृताचे लग्न दिल्लीचा मुंडा हिमांशू मल्होत्रासोबत झाले आहे. दहा वर्षे डेटिंग केल्यानंतर दोन वर्षांपूर्वी अमृता आणि हिमांशू यांनी आपल्या प्रेमाचे रुपांतर लग्नात केले. एमबीए केलेल्या हिमांशूची आणि अमृताची भेट ‘इंडियाज बेस्ट सिनेस्टार..’ या शोमध्ये झाली होती. याच शोमध्ये मुंबईची मुलगी अमृता आणि दिल्लीचा मुंडा हिमांशू या दोघांचे सूर जुळून आले होते. त्यावेळी दोघेही स्ट्रगलर होते. आज अमृता मराठी सिनेसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री आहे, तर हिमांशूदेखील टीव्ही इंडस्ट्रीतील प्रसिद्ध चेहरा आहे. पंजाबी पद्धतीने दोघांचे लग्न झाले.

टिपिकल नवरा झालाय हिमांशू...
Divyamarathi.com ला अलीकडेच दिलेल्या मुलाखतीत अमृताने हिमांशू नवरा म्हणून कसा आहे, हे सांगितले होते. अमृताने सांगितले, "हिमांशू टिपिकल नवरा आहे. त्याला मी सतत जवळ हवी असते. जर मी एक दिवसही इतर काही कामात अडकले आणि त्याच्यासाठी वेळ देऊ नाही शकले, तर मग त्याची कुरबूर सुरू होते. मग तो माझ्याशी न बोलता, एकदम शांत होऊन जातो. असं झालं की मग मी आजकाल समजून जाते. की त्याचं काहीतरी बिनसलंय. लग्नाअगोदर तो असा नव्हता. खूप परिपक्वपणे बोलायचा. आम्ही एखाद्या कपलप्रमाणे सतत एकमेकांसोबत चिटकून नाही राहायचो. पण आता लग्नानंतर कधी कधी माझं लक्ष त्याच्याकडे वेधून घेण्यासाठी तो काही ना काही लहान मुलांसारखं वागतो. एकदम Attention Seeker झालाय तो. त्याला माझ्यासोबत लहान मुलासारखं मस्ती करायला आवडतं. मी सतत त्याच्या पाठी-पाठी फिरावं असं त्याला वाटतं. कधी कधी, एकदम नवरेगिरी करतो. अगदी पझेसिव्ह आहे तो माझ्यासाठी. पण याबद्दल माझी काही तक्रार नाहीये. कारण त्यामागे त्याचं प्रेम आहे. आत्ताचं लग्न झालंय आणि हाच काळ नवीन लग्न झालेल्या जोडप्याला एकमेकांच्या सहवासात जास्तीत जास्त काळ घालवावासा वाटतो.”

अमृताच नव्हे आणखी 12 मराठी सेलिब्रिटींनीही केलंय इंटरकास्ट मॅरेज...
अमृताप्रमाणेच मराठी फिल्म इंडस्ट्रीतील अनेक सेलिब्रिटींनीसुद्धा जातीपातीची बंधन झुगारुन प्रेम केले. फक्त प्रेमच नाही तर पुढे लग्न करुन हे सेलिब्रिटी गुण्यागोविंदाने आपला संसारसुद्धा करत आहेत.

या पॅकेजमधून आम्ही तुम्हाला मराठी इंडस्ट्रीतील कोणकोणत्या सेलिब्रिटींनी आंतरजातीय विवाह केला, याची खास माहिती सांगत आहोत... चला तर मग जाणून घेऊया भिन्न सांस्कृतिक वातावरणात वाढलेल्या तरुण-तरुणींशी विवाह करणा-या या प्रसिद्ध मराठी सेलिब्रिटींच्या लव्ह स्टोरीविषयी...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...