आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुणाची 54 तर कुणाची 36 वर्षांपासून जमली आहे जोडी, या मराठी सेलिब्रिटींना असे गवसले जोडीदार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं... हे अगदी बरोबर आहे. सामान्य माणुस असो, किंवा सेलिब्रिटी प्रेम हे सर्वांसाठी सारखंच असतं. लग्नाच्या गाठी स्वर्गात बांधल्या जातात, असे म्हटले जाते. म्हणूनच आपला आयुष्यभराचा सोबती कधी कुठल्या वळणावर आपल्याला भेटेल याचा काही नेम नसतो. आता हेच बघा ना, मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते सचिन पिळगांवकर आणि सुप्रिया पिळगांवकर यांची भेटसुद्धा अतिशय रंजक पद्धतीने झाली होती.
 
दूरदर्शनवर 'किलबिल' या मुलांसाठीच्या कार्यक्रमात सुप्रिया यांनी म्हातारीची भूमिका साकारली होती. योगायोगाने सचिनजींच्या आईच्या नजरेत ही 'तरुण' म्हातारी भरली आणि त्यांनीच सचीन यांच्याकडे 'नवरी मिळे नव-याला' या चित्रपटाच्या नायिकेसाठी सुप्रिया यांच्या नावाची शिफारस केली होती. सचिन यांना पहिल्याच नजरेत सुप्रिया पसंत पडल्या होत्या. चित्रपटाच्या सेटवर दोघांमध्ये नाजूक बंध गुंफले गेले आणि प्रत्यक्षातली नवरी नव-याला मिळाली. 21 डिसेंबर 1985 रोजी सचिन-सुप्रिया यांच्या सहजीवनाला सुरुवात झाली. यांच्या लग्नाला यावर्षी 32 वर्षे पूर्ण होणार आहेत. विशेष म्हणजे आज (17 ऑगस्ट)  सचिन पिळगांवकर यांचा वाढदिवस असून त्यांनी वयाची 60 वर्षे पूर्ण केली आहेत. तर काल म्हणजेच 16 ऑगस्ट रोजी सुप्रिया यांचा वाढदिवस होता. त्यांनी वयाची 50 वर्षे पूर्ण केली आहेत. 
 
सचिन पिळगांवकर यांच्याप्रमाणेच अतुल परचुरे, केदार शिंदे, सचित पाटील यांसह अनेक सेलिब्रिटींनी लव्ह मॅरेज केले आहे. तर विजय पाटकर, पंकज विष्णूसह अनेक सेलिब्रिटींनी अरेंज मॅरेज केले. आपल्या अभिनयाने एक काळ गाजवाणारे ज्येष्ठ अभिनिते रमेश देव आणि सीमा देव यांच्या लग्नाला 54 वर्षे झाली आहेत. एवढ्या वर्षांत या दोघांमधील प्रेम अधिकच खुलत चाललंय.

चला तर मग मराठी इंडस्ट्रीतील तुमच्या आवडत्या कलाकाराला त्याचा आयुष्यभराचा साथीदार कसा गवसला आणि त्यांच्या सुखी वैवाहिक जीवनाला किती वर्षे झाली आहेत, हे जाणून घेऊयात...
बातम्या आणखी आहेत...