आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Marathi Celebrities Sharing Their New Year Resolutions

New Year Resolution: वाचा सेलिब्रिंटींनी काय केलेत नव्या वर्षाचे संकल्प

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवे वर्ष सुरू झाले, की मनात अनेक आशा आकांक्षा आणि इच्छा असतात. त्या सुप्त इच्छा मग नवीन वर्षाच्या संकल्पाच्या निमित्ताने पूर्ण करण्याची अनेकांची इच्छा असते. ब-याचदा हे संकल्प बनतातच, फक्त तोडण्यासाठी. तेरड्याच्या तीन दिवसांच्या रंगाप्रमाणेच काही दिवसांत संकल्पांचा विसर पडत असला तरीही अनेकजण संकल्प करणं काही सोडत नाहीत. वाचा आपल्या सेलिब्रिटींनी काय केलेत नव्या वर्षाचे संकल्प.
प्रार्थना बेहरे-
मी न्यू इअर रिजोल्यूशन करत नाही. तर प्रत्येक वर्षी एक डायरी लिहिणं पसंत करते. ज्यात येत्या वर्षात मला करायच्या असलेल्या १० गोष्टी नमूद करते आणि त्या कशा पूर्ण होतील यावर लक्ष्य केंद्रित करते. त्यातील काही पूर्ण होतात तर काही होत नाही. त्यामुळे माझं मलाच कळून येत नेमकी मेहनत कुठे करायची आहे. माझ्या मते न्यू इअर रिजोल्यूशनचा उद्देश्य देखील हाच असतो. २०१५ माझ्यासाठी खूप लकी होतं. कारण या वर्षीने मला ओळख दिली. त्याअगोदर माझी ओळख पवित्र रिश्तामध्ये एक भूमिका करणारी अभिनेत्री एवढीच होती. आता मात्र 'मितवा' आणि 'कॉफी आणि बरंच काही' या सिनेमामुळे मला ख-या अर्थाने लोकं हिरोइन म्हणून ओळखू लागले, आता आगामी वर्षात येणाऱ्या 'मिस्टर एंड मिसेस सदाचारी' आणि स्वप्ना वाघमारे जोशीच्या ‘फुगे’ या सिनेमात मी दिसेन. ५ जानेवारीला असणारा माझा वाढदिवस नेहमीच माझी नवीन वर्षाची सुरवात स्पेशल करतो. त्यामुळे नवीन वर्षासाठी मी नेहमीच एक्साईट असते. २०१५मध्ये मला गाडी घ्यायची होती. ती काही इच्छा पूर्ण झाली नाही. पण आता २०१६ला माझी मोठी गाडी घ्यायची इच्छा पूर्ण करेन.

राकेश बापट
यंदाच्या वर्षी माझ्या संपूर्ण कुटुंबासोबत आमच्या फार्महाऊसवर एकत्र जमून आम्ही नवीन वर्षाचं स्वागत करणार आहोत. माझ्या घरच्यांसोबत वेळ घालवल्याचाही आनंद यात आहे. २०१६ वर्षाचं रिजोल्यूशन सुद्धां मी केलं आहे. यावर्षी मी माझ्या कामाचं आणखी चांगल्यारीतीने प्लानिंग आणि त्याचं काटेकोर पद्धतीने पालन करणार आहे. गेल्या वर्षी माझं शेड्यूल्ड खूप विस्कळीत होतं. ज्यामुळे माझी रोजची कामं बऱ्याच प्रमाणात विस्कळीत होती. त्या गोष्टीची काळजी मी यावेळेस पुरेपूर घेणार आहे. या वर्षी मी मराठी सिनेमात काम करताना दिसेन.
अदिती सारंगधर
न्यू इयर रिजोल्यूशन शक्यतो मी करत नाही. पण मी गेली काही वर्ष फक्त काम करतेय. मला थोडी शांतता हवीय. त्यामूळे योगा आणि ध्यानधारणेकडे यंदा कल माझा कल असेल.
पुढील स्लाइडमध्ये वाचा, उर्मिला कानिटकर आणि अमृता खानविलकरचं न्यू इयर रिजोल्यूशन