आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sai Tamhankar, Spruha Joshi And Many More Marathi Celebrity On Crow Calendar 2015

सई-स्पृहासह मराठीतील प्रसिद्ध चेहरे झळकले 'सेलेब्रिटी कावळे कॅलेंडर 2015'वर, पाहा खास PICS

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मराठमोळा तरुण सुमित पाटील नववर्षाचे एक आगळेवेगळे कॅलेंडर घेऊन आला आहे. सुमितच्या कॅलेंडरचे वैशिष्ट्य म्हणजे त्यात असलेले कावळे. काकप्रेमी असलेल्या सुमीतने मराठीतील प्रसिद्ध 24 सेलिब्रिटींना घेऊन केले कॅलेंडर तयार केले आहे. सुमितच्या या कॅलेंडरचे नाव आहे 'सेलेब्रिटी कावळे कॅलेंडर 2015'.
छायाचित्रण, नेपथ्य, वेशभूषा, चित्रकला, काव्य, कलादिग्दर्शन म्हणून ओळखला जाणा-या सुमित पाटीलने तयार केलेले हे कॅलेंडर अलीकडेच प्रकाशित करण्यात आले आहे. या कॅलेंडरवर मराठीतील प्रसिद्ध सेलिब्रिटींसोबतच, संगीतकार, गायक, पत्रकार, खेळाडूंनाही स्थान देण्यात आले आहे.
सई ताम्हणकर, अभिजीत खांडकेकर, जयवंत वाडकर, स्पृहा जोशी, सुलेखा तळवलकर, कुशाल बद्रिके, तन्वी पालव या कलाकारांसह अनेक प्रसिद्ध चेहरे या कॅलेंडरवर झळकले आहेत.
स्लाईड्समध्ये पाहा कॅलेंडरवरील सेलिब्रिटींचा खास अंदाज...