निपुण धर्माधिकारी दिग्दर्शित 'बापजन्म' हा चित्रपट आज म्हणजे 29 सप्टेंबर रोजी बॉक्स ऑफिसवर रिलीज झाला आहे. सचिन खेडेकर यांची प्रमुख भूमिका या चित्रपटात आहे. रिलीजपूर्वी गुरुवारी मराठी इंडस्ट्रीतील कलाकारांसाठी या चित्रपटाचे स्पेशल स्क्रिनिंग ठेवण्यात आले होते. सचिन खेडेकर पत्नी आणि दोन्ही मुलांसोबत स्क्रिनिंगला पोहोचले होते. याशिवाय अभिनेता श्रेयस तळपदे आणि त्याची पत्नी दिप्ती तळपदे, अमृता सुभाष, जयवंत वाडकर, प्रिया बापट, स्वानंदी टिकेकर, सखी गोखले, शुभांगी गोखले, ओमप्रकाश शिंदे, सुनील बर्वे आणि त्यांची पत्नी, नेहा जोशी, चिन्मयी सुमीत यांच्यासह अनेक कलाकारांनी या स्क्रिनिंगला उपस्थिती लावली होती.
पाहुयात, बापजन्म या चित्रपटाच्या स्क्रिनिंगची खास क्षणचित्रे...