आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निर्मात्याच्या पार्टीत पोहोचले मराठी सेलेब्स, दीर्घ काळानंतर दिसला \'परशा\'

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एंटरटेन्मेंट डेस्कः एफ यू गाजलेल्या मराठी चित्रपटाचे निर्माते महेश पटेल यांनी आयोजित केलेल्या बर्थडे पार्टीत मराठी इंडस्ट्रीतील अनेक कलाकारांनी उपस्थिती लावली होती. महेश मांजरेकर, मेधा मांजरेकर, जयवंत वाडकर, त्यांची पत्नी आणि मुलगी स्वामिनी वाडकर, भारती आचरेकर, सिद्धार्थ जाधव आणि त्याची पत्नी तृप्ती जाधव, पूजा सावंत, संगीतकार राहुल रानडे  सेलिब्रिटी फोटोग्राफर तेजस नेरुळकर यांच्यासह अनेक सेलिब्रिटींनी या पार्टीला उपस्थिती लावली होती. 

पण या सगळ्या सेलिब्रिटींमध्ये लक्ष वेधून घेतले ते प्रेक्षकांच्या लाडक्या परशाने. 'सैराट' या चित्रपटातून प्रसिद्धीझोतात आलेला अभिनेता आकाश ठोसर या पार्टीला उपस्थित होता. आकाशने महेश मांजरेकर दिग्दर्शित आणि महेश पटेल यांची निर्मिती असलेल्या 'एफ यू' या चित्रपटात महत्त्वाची भूमिका वठवली होती. या पार्टीचे खास फोटोज अभिनेते जयवंत वाडकर यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केले आहेत. फोटोज शेअर करुन त्यांनी लिहिले, ''निधी वाढदिवसाच्या शुभेच्छा Mahesh patel d gre8''

या फोटोजवरुन सर्वच सेलिब्रिटींनी निधीची बर्थडे पार्टी खूप एन्जॉय केल्याचं दिसतंय. 
पाहुयात, पार्टीची खास झलक छायाचित्रांमध्ये..  
बातम्या आणखी आहेत...