Home »Bollywood »Marathi Cinekatta» Marathi Celebs Attend Zee Cine Awards Night

झी सिने अवॉर्ड नाइटच्या रेड कार्पेटवर मराठी सेलेब्सचा जलवा, साडीत अनकन्फर्टेबल दिसली सई

दिव्य मराठी वेब टीम | Mar 15, 2017, 11:41 AM IST

मुंबईत शनिवारी रात्री झी सिने अवॉर्ड्स सोहळा पार पडला. या अवॉर्ड नाइटमध्ये सलमान खान, अनुष्का शर्मा, करीना कपूर, सनी लियोनी, आलिया भट, सुभाष घई, दिशा पाटनी, डायना पेंटी, हृतिक रोशन, टायगर श्रॉफ आणि सोनाली बेंद्रेसह अनेक सेलेब्स रेड कार्पेटवर अवतरले होते.

मराठी सेलिब्रिटींचा दिसला जलवा...
बॉलिवूड सेलिब्रिटींसोबतच मराठी इंडस्ट्रीतील अनेक आघाडीच्या कलाकारांनी झी सिने अवॉर्ड्सच्या रेड कार्पेटवर दमदार एन्ट्री घेतली. 'हंटर' सिनेमातून बॉलिवूडमध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणारी अभिनेत्री सई ताम्हणकर, 'सैराट'चे दिग्दर्शक नागराज मंजुळे आणि अभिनेता आकाश ठोसर, प्रिया बापट, संस्कृती बालगुडे, सुप्रिया पिळगावकर, श्रिया पिळगावकर, जितेंद्र जोशी, संतोष जुवेकर, अमृता खानविलकर या मराठी सेलिब्रिटींचा रेड कार्पेटवर जलवा बघायला मिळाला. डिझायनर आऊटफिट्समध्ये हे सर्व सेलिब्रिटी अतिशय सुंदर दिसले.

साडीत अनकन्फर्टेबल दिसली सई
रेड कार्पेटवर सई डिझायनर साडीत अवतरली होती. या साडीत ती अतिशय आकर्षक दिसली. पण साडी पायात अडखळल्याने सई थोडावेळ अनकन्फर्टेबल दिसली. पण लगेचच साडी सावरत सई आत्मविश्वासाने वावरताना दिसली.

आलिया भट आणि अमिताभ बच्चन ठरले सर्वोत्कृष्ट
अनिरुद्ध रॉय चौधरी दिग्दर्शित आणि अमिताभ बच्चन-तापसी पन्नू स्टारर 'पिंक' या सिनेमाला ज्युरी चॉईसच्या श्रेणीत सर्वोत्कृष्ट सिनेमाचा अवॉर्ड देण्यात आला. तर या यादीत आलिया भटला 'उडता पंजाब' सिनेमातील भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्री आणि पिंक सिनेमासाठी अमिताभ बच्चन यांनी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

ज्युरी चॉईसमध्ये हे ठरले पुरस्कारांचे मानकरी..
बेस्ट डेब्यूटेंट (फीमेल) : रितिका सिंह (साला खडूस)
बेस्ट डेब्यूटेंट (मेल) : जिम सर्भ (नीरजा)
बेस्ट डायरेक्टर : राम माधवानी (नीरजा)
बेस्ट सपोर्टिंग अॅक्ट्रेस : शबाना आजमी (नीरजा)
बेस्ट सपोर्टिंग अॅक्टर : ऋषि कपूर (कपूर अँड सन्स)
बेस्ट अॅक्टर इन नेगेटिव रोल : जिम सर्भ (नीरजा)
बेस्ट अॅक्टर इन कॉमिक रोल : ऋषि कपूर (कपूर अँड सन्स)

व्यूअर चॉईस अवॉर्डची यादी
बेस्ट फिल्म : दंगल
बेस्ट अॅक्टर : सलमान खान (सुल्तान)
बेस्ट अॅक्ट्रेस : अनुष्का शर्मा (सुल्तान)
सॉन्ग ऑफ द ईयर : चन्ना मेरेया (ऐ दिल है मुश्किल)
पुढील स्लाईड्सवर बघा, अवॉर्ड्स नाइटच्या रेड कार्पेटवर अवतरलेल्या मराठी सेलेब्सचे खास PHOTOS...

Next Article

Recommended