आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PIX: असा होता झी युवाच्या पुणे महोत्सवाचा थाट, मराठी सेलेब्सच्या परफॉर्मन्सनी लावले चारचाँद

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
संगीत, नृत्य, कला, गायन, वादन यांचा मिलाफ असलेला 'पुणे महोत्सव' 17  सप्टेंबर 2017 ला दुपारी 12 आणि संध्याकाळी 7 वाजता झी युवावर पहायला मिळणार आहे. मराठी इंडस्ट्रीतील अनेक नामवंत कलाकारांच्या परफॉर्मन्स या कार्यक्रमात आहेत. सुबोध भावे, सोनाली कुलकर्णी, मानसी नाईक, संस्कृती बालगुडे, सागर कारंडे , विशाखा सुभेदार , समीर चौगुले , मिलिंद शिंतरे , विजय पटवर्धन , मयुरेश पेम , प्राजक्ता माळी , तेजस बर्वे , ज्ञानदा रामतीर्थकर , रेशम प्रशांत आणि संगीत सम्राटाचे स्पर्धक पुणे महोत्सवात स्वतःची कला सादर करणार आहेत. प्रेक्षकांचा रविवार मनोरंजित करण्यासाठीच झी युवा ही वाहिनी 'पुणे महोत्सव 'हा एक अतिशय उत्तम दर्जाचा कार्यक्रम घेऊन आलेली आहे.  
 
झी युवा च्या 'पुणे महोत्सव' चे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे, या महोत्सवाच्या निमित्ताने झी युवा खऱ्या अर्थाने स्त्री शक्तीचा सन्मान करणार आहे. 5 गुणवान युवतींचा ज्यांनी त्यांच्या आयुष्यात स्व कर्तृत्वावर स्वतःचे नाव कमावले अशा्रणिती शिंदे (तरुण महिला राजकारणी), पूर्वा बर्वे ( बॅडमिंटन प्लेअर) , गौरी गाडगीळ (कलाकार) , ऋतुजा केकावळे (विद्यार्थी) , कृष्णा पाटील (एव्हरेस्टवीर महिला गिर्यारोहक) यांचा मानपत्र देऊन गौरव करण्यात आला आहे. झी युवावर मराठी कलाकाराच्या अदाकारीने रंगलेला आणि महाराष्ट्रातील गुणवान युवतींचा सन्मान सोहळा पाहण्यासाठी पुणे महोत्सव हा कार्यक्रम पहायला विसरू नका.

तत्पूर्वी बघा, या कार्यक्रमाची छोटीशी झलक छायाचित्रांमध्ये... 
बातम्या आणखी आहेत...