आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Marathi Celebs Enjoyed A Lot In Italy France And Spain

क्रूजवर रोमँटिक झाले आदिनाथ-उर्मिला, सनीची धमाल, अशी झाली मराठी Celebs ची परदेशवारी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फोटोः डावीकडे- वर - इटलीतील प्रसिद्ध पीसा मिनारसमोर मनवा नाईक, (खाली) - क्रूजवर सनी लिओनसोबत सेल्फी घेताना मानसी नाईक, उजवीकडे (वर) - रोमँटिक अंदाजात आदिनाथ आणि उर्मिला कोठारे, (खाली) - पीसा मिनारसमोर अभिनेता समीर धर्माधिकारी. - Divya Marathi
फोटोः डावीकडे- वर - इटलीतील प्रसिद्ध पीसा मिनारसमोर मनवा नाईक, (खाली) - क्रूजवर सनी लिओनसोबत सेल्फी घेताना मानसी नाईक, उजवीकडे (वर) - रोमँटिक अंदाजात आदिनाथ आणि उर्मिला कोठारे, (खाली) - पीसा मिनारसमोर अभिनेता समीर धर्माधिकारी.

25 ऑक्टोबर ते 1 नोव्हेंबर याकाळात मराठी इंडस्ट्रीतील अनेक सेलिब्रिटी परदेशवारीवर होते. निमित्त होते दुस-या IMFFA म्हणजेच इंटरनॅशनल मराठी फिल्म फेस्टिव्हल अवॉर्ड्स सोहळ्याचे. यावर्षी स्पेन, इटली आणि फ्रान्स या तीन युरोपियन देशांच्या बार्सिलोना, नेपल्स, रोम, फ्लोरेन्स, कान्स,पाल्मा या सहा सागरी तटांची सफर या अवॉर्ड सोहळ्याच्या निमित्ताने मराठी तारे-तारकांना झाली. तर नॉरवेयन क्रुझवरून भूमध्य समुद्रात यंदा हे फंक्शन रंगले.
गेल्यावर्षीपासून इम्फा अवॉर्ड फंक्शन सुरू झाले. या अवॉर्ड्स सोहळ्याची खासियत म्हणजे हा सोहळा क्रुझवर होतो. गेल्यावर्षी हाँगकाँग, चायना, व्हिएतनाम या तीन देशांच्या बंदारांमध्ये मराठी सेलेब्सनी फाइव्हस्टार क्रुझ सफारी केली होती. यावर्षी इम्फाच्या आयोजक सेलिब्रिटींना सात दिवसांच्या क्रुझसफारीवर घेऊन गेले होते.
विशेष म्हणजे यावर्षी अवॉर्ड सोहळ्यात प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओन सहभागी झाली होती. मराठी सेलिब्रिटींनी हा टुर अगदी मनापासून एन्जॉय केला आहे. स्पेन, इटली आणि फ्रान्समधील अनेक स्थळांना सेलिब्रिटींनी भेट दिली. शिवाय मनसोक्त फोटोग्राफीची हौसही भागवली.
मनवा नाईक, सोनाली कुलकर्णी, वैभव तत्त्ववादी, समीर धर्माधिकारी, गायिका बेला शेंडे, अभिजीत खांडकेकर, मानसी नाईकसह अनेक सेलिब्रिटींनी या परदेशवारीची छायाचित्रे आपल्या सोशल नेटवर्किंग साइट्सवर शेअर केली आहेत. क्रूजवर आदिनाथ कोठारे आणि उर्मिला कानेटकर-कोठारेचा रोमँटिक अंदाज बघायला मिळाला. तर मानसी नाईकने सनी लिओनसोबत सेल्फी घेतला.
पीसा मनोरासमोर आवर्जुन काढले फोटो
विशेष म्हणजे इटलीतील प्रसिद्ध पीसा मिनारसमोर सर्वच सेलिब्रिटींनी आवर्जुन फोटो काढले. कुणी या पीसा मिनारला हातावर उलगद उचलताना फोटो क्लिक केला, तर कुणी त्याला पडण्यापासून वाचवण्याचा प्रयत्न करत असतानाच्या पोजमध्ये फोटो काढले.
पीसा मनोराचे वैशिष्ट्य...
इटलीतील ऐतिहासिक शहर असलेल्या पीसा येथे हा झुकता मनोरा आहे. या मनो-याचे बांधकाम बाराव्या शतकात सुरुवात झाले. पुढे दोनशे वर्षे निरनिराळ्या टप्प्यात त्याचे बांधकाम सुरूच होते. बांधकाम सुरू असतानाच तो पाया मजबूत नसल्याने झुकायला सुरुवात झाली होती. त्यामुळे पुढची शंभर वर्ष त्याच्यावर काहीच काम केले गेले नाही. मग आतली जमीन पक्की होउन मनोरा थोडा स्थिर झाल्यावर वरचे मजले बांधले गेले. मनोर्‍याला एकूण सात मजले आहेत. ते एखाद्या केकसारखे एकावर एक रचलेले. बाजूने रोमन खांबांच्या गॅलरीज. सर्वात वरचा आठवा मजला तर मुकुटासारखा गोलाकार, मधोमध आहे. तिथे ब्रॉन्झच्या अजस्त्र घंटा बांधलेल्या आहेत. वर जाण्यासाठी सोळा युरोचं वेगळे तिकिट काढावे लागते.
चला तर या सेलिब्रिटींची परदेशवारीची खास धमाल, आम्ही तुम्हाला छायाचित्रांच्या माध्यमातून दाखवत आहोत... पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि पाहा, स्पेन, इटली आणि फ्रान्समध्ये मराठी सेलिब्रिटींनी कसे एन्जॉय केले...