आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PIX : मराठी सेलिब्रिटींनी केली जीवाची अमेरिका, लॉस एंजेलिसमध्ये केली अशी धमाल-मस्ती

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटोः डावीकडे (वर) - अभिजीत खांडकेकर आणि मृण्मयी देशपांडे, (खाली) - मृण्मयी देशपांडे, ललित प्रभाकर, अभिजीत खांडकेकर, भारत गणेशपुरे, श्रेया बुगडे, (उजवीकडे वर) - शशांकर केतकर, (खाली) - प्राजक्ता माळी)
अलीकडेच लॉस एंजेलिसमध्ये बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या 17 वे अधिवेशन पार पडले. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या अधिवेशनाचे अध्यक्षस्थान भूषविले. या अधिवेशनात अमेरिका आणि कॅनडातील चार हजारांहून अधिक मराठी बांधव सहभागी झालेत. या अधिवेशनाचे आणखी एक वैशिष्ट्य ठरले मराठीतील अनेक कलाकारांनी सादर केलेले विविध परर्फामन्सेस.
अभिजीत खांडकेकर, हेमांगी कवी, भारत गणेशपुरे, मृण्मयी देशपांडे, प्राजक्ता माळी, ललित प्रभाकर, सागर कारंडे, अवधूत गुप्ते, वैशाली सामंत, श्रेया बुगडे-सेठ, शशांक केतकर यांसह बरेच मराठी कलाकार या कार्यक्रमात सहभागी झाले होते. अवधूत गुप्ते, वैशाली सांमत यांचा लाईव्ह संगीत कार्यक्रमासोबत 'गोष्ट तशी गंमतीची' हे लाईट कॉमेडी नाटक येथे सादर झाले.
कार्यक्रमाच्या बिझी शेड्यूलमधून वेळ काढत हे मराठी सेलिब्रिटी जीवाची अमेरिका करताना दिसले. या सेलिब्रिटींनी लॉस एंजिलिसमधील अनेक स्थळांना भेटी दिल्या. शिवाय त्यांच्या धमाल-मस्तीचे भरपूर फोटोजसुद्धा क्लिक केले.
या सेलिब्रिटींनी त्यांच्या धमाल मस्तीचे फोटोज आपल्या सोशल मीडियावरसुद्धा शेअर केले आहेत. चला तर मग तुम्हीही पाहा, सेलिब्रिटींनी कशी एन्जॉय केली परदेशवारी...