पहिला मराठी फिल्मफेअर अवॉर्ड सोहळा मोठ्या थाटात मुंबईत पार पडला. अगदी हिंदीप्रमाणेच हा सोहळा भव्यदिव्य पद्धतीने आयोजित करण्यात आला होता. यावेळी रेड कार्पेटवर मराठीतील तारे ग्लॅमरस रुपात अवतरले होते.
कोणकोण पोहोचले...
सुनील बर्वे, संस्कृती बालगुडे, आदिती सारंगधर, श्रृती मराठे, विजय पाटकर, संगीतकार चिनार आणि महेश, गायिका वैशाली सामंत, शर्वाणी पिल्ले, भरत दाभोळकर, अभिनय सावंत, वीणा जामकर, गायक सुदेश भोसले, प्रिया बापट, उमेश कामत, सई ताम्हणकर, रितेश देशमुख, अमृता खानविलकर, अनिकेत विश्वासराव, संदीप पाठक, हेमंत ढोमे, गिरीश कुलकर्णी, आदिनाथ कोठारे, उर्मिला कोठारे, रमेश देव, सीमा देव, अजिंक्य देव, शरद पोंक्षे, अश्विनी एकबोटे, निशिगंधा वाड, दिपक देऊळकर, चिन्मय मांडलेकर, सुकन्या कुलकर्णी, वर्षा उसगांवकर, रेणुका शहाणे, मकरंद देशपांडे, मानसी मोघे, इरावती हर्षे, शरद केळकर, सोनाली कुलकर्णी, नीना कुळकर्णी, सचिन आणि सुप्रिया पिळगांवकर यांच्यासह मराठी फिल्मइंडस्ट्रीचे अनेक स्टार्स दिसले. तर तब्बू, उर्मिला मातोंडकर, विद्या बालन, वरुण धवन, आथिया शेट्टी, सूरज पांचोली यांसारख्या बॉलिवूडकरांची पहिल्या मराठी फिल्मफेअरला उपस्थिती होती.
कोणत्या सिनेमाचे ठरले वर्चस्व
या सोहळ्यात ‘लय भारी’ सिनेमाला पाच, ‘फॅन्ड्री’ सिनेमाला चार, ‘रेगे’ चार, ‘एलिझाबेथ एकादशी’ला चार, ‘डॉ. प्रकाश बाबा आमटे’ सिनेमाला तीन, ‘रमा माधव’ सिनेमाला दोन, ‘अस्तू’ सिनेमाला दोन, ‘एक हजाराची गोष्ट’ सिनेमाला एक, ‘पोस्टकार्ड’ला एक, ‘टाइमपास’ सिनेमाला एक, ‘यलो’ सिनेमाला एक असे पुरस्कार मिळालेले आहेत. या सोहळ्यात ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
(Filmfare Awardsमध्ये रितेश ठरला ‘लय भारी’, तर ‘डॉ. प्रकाश बाबा आमटे’ सर्वोत्कृष्ठ चित्रपट)Its Selfie Time...
आता आम्ही तुम्हाला दाखवत आहोत, सोहळ्यादरम्यानचा सेलिब्रिटींचा सेल्फी लूक... सोनाली कुलकर्णी, रितेश देशमुख, अमृता खानविलकर, मानसी मोघे, वरुण धवन, क्रांती रेडकर, सई ताम्हणकरसह अनेक सेलिब्रिटीं यावेळी सेल्फी मूडमध्ये दिसले. काहींनी पुरस्कार मिळाल्यानंतर ब्लॅक लेडीसोबत तर काहींनी आपल्या फ्रेंड्ससोबत सेल्फी क्लिक केल्या.
चला तर मग पाहुयात, सेल्फी मूडमध्ये कसे दिसले मराठीतील लखलखते तारे...