आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हे आहेत मराठी सेलेब्सचे \'#कच्चालिंबू\', पहिल्यांदाच शेअर केले मुलांसोबतचे Photos

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एंटरटेन्मेंट डेस्कः प्रसाद ओक दिग्दर्शित आणि सोनाली कुलकर्णी, रवी जाधव, सचिन खेडेकर, मनमीत पेम यांच्या प्रमुख भूमिका असलेला 'कच्चा लिंबू' हा चित्रपट येत्या 11 ऑगस्ट रोजी रिलीज होतोय. चित्रपटासाठी कलाकार नेहमीच हटके प्रमोशनल आयडिया अंमलात आणत असतात. कच्चा लिंबू या चित्रपटाची टीमदेखील हटके पद्धतीने त्यांच्या चित्रपटाचे प्रमोशन करत आहे. यावेळी कलाकार सोशल मीडियाच्या माध्यमातून चित्रपटाचे हटके अंदाजात प्रमोशन करत आहेत. काही दिवसांपूर्वीच रवी जाधव यांनी त्यांच्या आईबाबांसोबतचा फोटो शेअर करुन स्पेशल आईबाबा या हॅशटॅगने कलाकार आणि सामान्यांना त्यांच्या आईवडिलांसोबतचे फोटोज फेसबुकवर शेअर करण्याचे आवाहन केले होते. त्यानंतर मोठ्या संख्येने कलाकार आणि सिनेरसिकांनी स्पेशल आईबाबा या हॅशटॅगने फोटोज शेअर करुन त्यांच्या आयुष्यातील जुन्या आठवणींना उजाळा दिला. 

''मी with my #कच्चालिंबू'' हे कॅप्शन देऊन रवी जाधव, सोनाली कुलकर्णी, प्रसाद ओक, मंदार देवस्थळी या कलाकारांनी त्यांच्या चिमुकल्यांसोबतचे फोटोज शेअर केले. चित्रपट आणि कलाकारांना शुभेच्छा देत अनेक सेलिब्रिटींनीसुद्धा आपल्या मुलांसोबतची छायाचित्रे फेसबुकवर शेअर केली आहेत. माझ्या नव-याची बायको फेम श्वेता मेहंदळे, दिग्दर्शक राजेश देशपांडे, अभिजीत केळकर, लोकेश आणि चैत्राली गुप्ते, गायिका जान्हवी प्रभू अरोरा, चिन्मय मांडलेकर यांच्या पत्नी, दिग्दर्शक राजू माने,  संगीतकार राहुल रानडे यांच्यासह अनेक सेलिब्रिटींनी पहिल्यांदाच त्यांच्या मुलांसोबतची छायाचित्रे शेअर केली आहेत. 

पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि बघा, सेलिब्रिटींचे त्यांच्या 'कच्चालिंबू'सोबतचे खास फोटोज... 
बातम्या आणखी आहेत...