आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'फोटोकॉपी\'च्या स्पेशल स्क्रिनिंगला \'तारें जमी पर\'... आशुतोष गोवारिकरांसह पोहोचले मराठी स्टार्स

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एन्टरटेन्मेंट डेस्कः आपल्या सुरेल आवाजासाठी प्रसिद्ध असलेल्या नेहा राजपाल आपल्याला आता नवीन भूमिकेत पाहायला मिळणार आहे. 'फोटोकॉपी' या सिनेमाच्या निमित्ताने निर्मात्याच्या भूमिकेत आपल्यासमोर आल्या आहेत. त्यांची पहिलीवहिली निर्मिती असलेला 'फोटोकॉपी' हा सिनेमा शुक्रवारी (16 सप्टेंबर) थिएटरमध्ये दाखल झाला आहे. नाट्यसृष्टीत आपल्या अभिनयाची छाप पाडणारी पर्ण पेठे आणि चेतन चिटणीस या नवोदित कलाकारांची यात प्रमुख भूमिका आहे, तर या दोघांसोबतच वंदना गुप्ते आणि अंशुमन जोशी हे देखील आपल्याला सिनेमात पाहायला मिळणार आहे.
मराठी स्टार्ससाठी स्पेशल स्क्रिनिंग...
सिनेमाच्या रिलीजच्या आधी मराठी इंडस्ट्रीतील सेलिब्रिटींसाठी या सिनेमाचे स्पेशल स्क्रिनिंग ठेवण्यात आले होते. या स्क्रिनिंगला बॉलिवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक आशुतोष गोवारिकर यांनी हजेरी लावली होती. यांच्यासह सुमीत राघवन, गायक आदर्श शिंदे, अमृता सुभाष, अनिकेत विश्वासराव, महेश लिमये, मकरंद देशपांडे, गायक स्वप्नील बांदोडकर, प्रकाश कुंठे, संतोष जुवेकर, सारंग साठे, शैलेंद्र बर्वे, दिग्दर्शिका स्वप्ना वाघमारे यांनी हजेरी लावली होती. सिनेमात मुख्य भूमिका साकारणारे पर्ण पेठे, चेतन चिटणीस, वंदना गुप्ते स्क्रिनिंगला दिसले. तर निर्मात्या आणि गायिका नेहा राजपाल आपल्या पतीसोबत स्क्रिनिंगला हजर होत्या.
जुन्या बहिणींची कहाणी...
व्हायकॉम इंटरनॅशनल आणि नेहा राजपाल यांची निर्मिती असलेल्या या सिनेमात जुळ्या बहिणींची कथा दाखवण्यात आली आहे. पर्ण पेठे सिनेमात दुहेरी भूमिकेत आहे. या सिनेमाची कथा ओमकार मंगेश दत्त आणि डॉ. आकाश राजपाल यांनी लिहिली असून विजय मौर्य यांनी सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे. सिनेमाची पटकथा तसेच संवाद विजय मौर्य आणि योगेश जोशी या दोघांनी मिळून लिहिले आहेत.

पुढील स्लाईड्समध्ये बघा, 'फोटोकॉपी'च्या स्क्रिनिंगला जमलेली मराठी स्टार्सची मांदियाळी...

(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...