आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Marathi Celebs Spotted At Trailer Launch Of Marathi Film Lal Ishq

\'लाल इश्क\'च्या ट्रेलर लाँचला हिरोईन्सच्या घोळक्यात दिसला स्वप्नील, ग्लॅमरस लूकमध्ये दिसले सेलेब्स

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
\'लाल इश्क\' या सिनेमाच्या ट्रेलर लाँचवेळी जमलेली सेलेब्सची मांदियाळी - Divya Marathi
\'लाल इश्क\' या सिनेमाच्या ट्रेलर लाँचवेळी जमलेली सेलेब्सची मांदियाळी
मुंबईः अभिनेता स्वप्नील जोशी आणि अंजना सुखानी स्टारर 'लाल इश्क' या सिनेमाचा ट्रेलर लाँच सोहळा शनिवारी मोठ्या दिमाखात पार पडला. संजय लीला भन्साळींची निर्मिती आणि स्वप्ना वाघमारे दिग्दर्शित या सिनेमात स्वप्नील आणि अंजना ही नवीन जोडी पडद्यावर एकत्र आली आहे. रोमान्स-सस्पेन्स-थ्रिलरचा तडका असलेल्या या सिनेमाच्या ट्रेलर लाँचला स्वप्नीलच्या हिरोईन्स अर्थातच सई ताम्हणकर, सोनाली कुलकर्णी आणि मुक्ता बर्वे यांनी आवर्जुन हजेरी लावली होती. यावेळी तिघींचाही ग्लॅमरस अंदाज पाहायला मिळाला. शिवाय पियुष रानडे, जयवंत वाडकर, समिधा गुरु यांच्यासह सिनेमाची संपूर्ण टीम या ट्रेलर लाँचला हजर होती.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा, ट्रेलर लाँचला पोहोचलेल्या सेलेब्सची छायाचित्रे... ('लाल इश्क' सिनेमाचा ट्रेलर बघण्यासाठी येथे क्लिक करा...)