आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Celebrity Ganesha: भरत जाधवसह अनेक मराठी सेलेब्सनी घेतले उमेश जाधवांच्या बाप्पाचे दर्शन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई : मराठीतील प्रसिद्ध कोरिओग्राफर उमेश जाधव यांच्या घरी विराजमान झालेल्या बाप्पाच्या दर्शनासाठी अनेक मराठी सेलिब्रिटी त्यांच्या घरी पोहोचले होते. उमेश यांच्या घरी दरवर्षी बाप्पाचे आगमन होत असून ते आपल्या बाप्पासाठी भव्य सजावट करत असतात. यावर्षी त्यांनी केरळ थीमवर आकर्षक सजावट केली.

त्यांच्या बाप्पाच्या दर्शनासाठी अभिनेता भरत जाधव सपत्नीक त्यांच्या घरी पोहोचले होते. भरत जाधव यांच्यासोबतट आदिनाथ कोठारे आणि त्याची पत्नी उर्मिला कानेटकर-कोठारे, महेश जाधव, गायिका वैशाली सामंत, कोरिओग्राफर दिपाली विचारे, रेमो डिसुजा आणि त्यांच्या पत्नी, दिग्दर्शक संजय जाधव, हर्षदा खानविलकर, कोरिओग्राफर फुलवा खामकर, दिग्दर्शक केदार शिंदे यांनी श्रींचे दर्शन घेऊन प्रार्थना केली.

पुढील स्लाईड्समध्ये पाहा उमेश जाधव यांच्या बाप्पांचे मनमोहून टाकणारे रुप आणि सोबतच पाहा त्यांच्या घरी पोहोचलेल्या सेलिब्रिटींची खास छायाचित्रे...

(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...