Home »Bollywood »Marathi Cinekatta» Marathi Celebs With There Kids

मराठी इंडस्ट्रीतील Daddy Cool, बघा सेलिब्रिटींचे मुलांसोबतचे खास Photos

दिव्य मराठी वेब टीम | Jun 19, 2017, 18:02 PM IST

  • चिन्मय मांडलेकर, स्वप्नील जोशी, कुशल बद्रिके, भाऊ कदम, भारत गणेशपुरे आणि सागर कारंडे त्यांच्या मुलांसोबत

एन्टरटेन्मेंट डेस्कः नुकताच फादर्स डे साजरा झाला. या दिवसाचे औचित्य साधत अभिनेता गश्मीर महाजनीने त्याचा मुलासोबतचा फोटो शेअर करुन “तुझ्यासोबत घालवलेल्या त्या क्षणांनी मला वडिल होण्याचं महत्त्व आणि त्यातली ममता शिकवली. तुला आज मिस करतोय, बाळा.” असे ट्विट केले. खरं तर गश्मीरच्या चाहत्यांसाठी हा एक मोठा धक्काच होता. कारण गश्मीरला मुलगा असल्याची बातमी त्याच्या चाहत्यांसोबतच मीडियालाही माहित नव्हती. यंदाच्या फादर्स डेच्या निमित्ताने मराठी इंडस्ट्रीचा मॅचोमॅन म्हणून प्रसिद्ध असलेला गश्मीर खासगी आयुष्यात 'डॅडी कूल' असल्याचे समोर आले आहे.

गश्मीरच नव्हे तर मराठी इंडस्ट्रीतील स्वप्नील जोशी, सुबोध भावे, प्रसाद ओलक, आदेश बांदेकर, रवी जाधव, कुशल बद्रिके, अतुल परचुरे, प्रियदर्शन जाधव, भारत गणेशपुरे, सिद्धार्थ जाधवसह अनेक सेलेब्स 'डॅडी कूल' म्हणून ओळखले जातात. हे सेलिब्रिटी आपल्या व्यस्त शेड्युलमधून वेळ काढत आपल्या लेकरांसोबत शक्य तितका वेळ घालवण्याचा प्रयत्न करत असतात. शिवाय त्यांच्यासोबतचे फोटोजही ते सोशल मीडियावर शेअर करतात.

चला तर मग पाहुयात मराठी सिनेसृष्टीतील सेलिब्रिटींचे त्यांच्या मुलांसोबतचे हे खास फोटोज...

Next Article

Recommended