आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

B\'day: ही आहे मराठी इंडस्ट्रीची \'डान्सिंग क्वीन\', अनप्रोफेशनल असल्याचा बसला होता ठपका

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एन्टरटेन्मेंट डेस्कः मराठी सिनेसृष्टीतील सुंदर, हॉट, बोल्ड अभिनेत्री म्हणून ओळखली जाणारी मानसी नाईक हिचा आज वाढदिवस असून तिने वयाची 30 वर्षे पूर्ण केली आहेत.  3  फेब्रुवारी 1987 रोजी पुण्यात जन्मलेली मानसी विज्ञान शाखेची पदवीधर आहे. पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयातून मानसीने तिचे शिक्षण पूर्ण केले आहे.
 
मराठी इंडस्ट्रीची आहे 'डान्सिंग क्वीन'... 
मराठी इंडस्ट्रीतील डान्सिंग क्वीन म्हणून तिला ओळखले जाते. मानसीच्या 'रिक्षावाला' या आयटम नंबरने संपूर्ण महाराष्ट्रभर धुमाकूळ घातला आहे. आकर्षक व्यक्तिमत्त्व, बोलके डोळे हे मानसीच्या रुपाचे वैशिष्ट्य. अल्पावधीतच मानसीने आपल्या सौंदर्य, नृत्य आणि अभिनयाने मराठी इंडस्ट्रीत स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले आहे. 'जबरदस्त', 'तीन बायका फजिती ऐका', 'ढोलकी', 'मर्डर मेस्त्री', 'द शॅडो', 'कॅरी ऑन देशपांडे' या सिनेमांमधून तिने धमाल भूमिका साकारल्या आहे. 'जलसा' या सिनेमात तिने ‘बाई वाड्यावर या…’ या गाण्यातून निळू फुलेना श्रद्धांजली दिली आहे. या गाण्याने देखील तरूणाईला वेड लावले आहे. लवकरच मानसी जॉनी लिव्हर यांच्यासोबत 'मला लगीन करायचंय' या नवीन गाण्यात ताल धरताना दिसणारेय. तिचा हा अल्बम लवकरच रिलीज होईल. 
 
अनप्रोफेशनल असल्याचा बसला होता मानसीवर ठपका... 
2014 मध्ये मानसी एका वादात अडकली होती. मानसी नाईकवर अव्यावसायिकतेचा ठपका ठेवत, ‘पहिली भेट’च्या निर्मात्यांनी मानसीला न्यायालयात खेचले होते. यामुळे ती चर्चेत आली होती. निर्मात्यांनी मानसी विरोधात दाखल केलेल्या खटल्यामध्ये तिच्याकडून वीस लाख रुपयांची नुकसानभरपाई मागितली होती. निर्माते दिलीप गंगवाणी यांनी ही तक्रार दाखल केली होती. त्यांच्या म्हणण्यानुसार, मानसीचे सेटवरील वर्तन उद्धटपणाचे होते. मानसी चित्रीकरण अर्ध्यावरच सोडून निघून गेल्यामुळे आपल्याला आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागले. तिच्या मनमानी वागण्यामुळे आम्हाला आर्थिक नुकसान सहन करावे लागले, असे निर्मात्यांचे म्हणणे होते. 
 
मानसीने लावले होते आरोप फेटाळून...   
मानसीने तिची बाजू मांडताना निर्मात्याने केलेले सर्व आरोप फेटाळून लावले होते. सुरुवातीपासून अनेक अडचणी येत असताना, मी सेटवर जुळवून घेत होते. निर्मात्यांनी माझा अनेकदा अपमान केला. मला व्हॅनिटी व्हॅनही उपलब्ध करुन दिली नाही. मी निर्मात्यांशी बोलण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांनी माझे फोन घेतले नाहीत. न्यायालयाबाहेर हा विषय मिटवण्याचा माझा प्रयत्न राहील, असे ती म्हणाली होती. 
 
रणवीर सिंहसोबत लग्न करायची आहे मानसीची इच्छा..  
मराठीतील ही हॉट तारका अद्याप अविवाहित आहे. तिला तिच्या स्वप्नातील राजकुमार अद्याप गवसलेला नाही. मात्र मानसीला तिच्या लग्नाविषयी विचारण्यात आल्यावर ती म्हणते, जर रणवीर सिंह लग्न करण्यासाठी तयार असेल तर मी लग्न करण्यासाठी तयार आहे. मानसी अभिनेता रणवीर सिंह याची खूप मोठी फॅन आहे आणि रणवीरचा अभिनय आणि खास करुन त्याची नृत्यशैली मानसली सतत त्याच्या प्रेमात पाडते. आणि मानसीच्या म्हणण्याप्रमाणे जर रणवीर सिंह तयार असेल तर मला त्याच्याशी लग्न करण्यात काहीच हरकत नसेल.  

सोशल नेटवर्किंगवर असते अॅक्टिव...
मानसीची फॅन फॉलोईंग जबरदस्त आहे. ती सोशल नेटवर्किंग साइट्सच्या माध्यमातून चाहत्यांच्या नेहमीच संपर्कात असते. नित्यनेमाने शूटिंग आणि डान्स शो आणि विविध फोटोशूटचे फोटोज ती फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर शेअर करत असते. 

मानसीच्या वाढदिवसाचे औचित्य साधत पाहुयात, तिच्या दिलखेचक अदा दाखवणारी ही खास छायाचित्रे...

फोटो सौजन्य- मानसी नाईक फेसबुक आणि ट्विटर पेज