आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिद्धार्थ जाधवच्या 'गेला उडत'ची शंभरीकडे वाटचाल, वाचा काय आहे नाटकाची वनलाईन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रंगभूमीवर १०० प्रयोगांचा टप्पा गाठणं कोणत्याही नाटकासाठी अभिमानाची बाब असते. हा मान आता स्टार अभिनेता सिद्धार्थ जाधवची प्रमुख भूमिका असलेल्या केदार शिंदे दिगदर्शित 'गेला उडत' या नाटकाला मिळत आहे. बेला शिंदे यांच्या थर्डबेल प्रॉडक्शन्स व प्रसाद कांबळी यांच्या भद्रकाली प्रॉडक्शन्स यांच्या संयुक्त विद्यमानाने या नाटकाची निर्मिती केली असून या नाटकाचा १०० वा प्रयोग रविवार १५ जानेवारीला दु.४ वाजता शिवाजी मंदिर नाट्यगृहात संपन्न होणार आहे. "गेला उडत" ही भद्रकाली प्रॉडक्शन्सची ५३वी नाट्यकृती आहे. 
 
नाटकाची वनलाईन... 
मारुती हा तरुण लहानपणापासूनच मारुतीच्या लीलांनी प्रभावित आहे. आपल्यातही मारुतीसारखी शक्ती आली आहे, असं त्याला वाटतं. स्वतःला तो मारुतात्मज म्हणवतो. घरच्या अडचणी आपण लीलया सोडवू अशी त्याची कल्पना असते. त्याला समजून घेता घेता त्याच्या घरच्यांच्या अडचणी वाढतात. शेवटी त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करावं लागतं. तिथली कॉन्सेलर डॉ. सायली त्याला तो सामान्य माणूस असल्याची आणि त्याच्याकडे कुठलीही सुपर नॅचरल पॉवर नसल्याची जाणीव करून देते. सामान्यपणाची जाणीव झालेला मारुती घरच्या अडचणी कशा सोडवतो असं नाटकाचं कथानक आहे.
 
पुढील स्लाईड्सवर बघा, या नाटकाची निवडक छायाचित्रे आणि जाणून घ्या नाटकाविषयी बरंच काही...