आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • First Look Launch Party Of Upcoming Marathi Film Aga Bai Arechyaa 2

\'अगं बाई अरेच्चा 2\'ची FIRST LOOK लाँच पार्टी, राज ठाकरेंसह जमली सेलिब्रिटींची मांदियाळी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
('अगं बाई अरेच्चा 2' या सिनेमाच्या फस्ट लूक लाँच पार्टीतील क्षणचित्रे)
प्रसिद्ध दिग्दर्शक केदार शिंदे लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येताहेत 'अगं बाई अरेच्चा 2' हा आगामी मराठी सिनेमा. 2004मध्ये केदार शिंदे यांनी 'अगं बाई अरेच्चा' हा सिनेमा आणला होता. आता तब्बल दहा ते अकरा वर्षांनी या सिनेमाचा सिक्वेल प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. या सिनेमातून अभिनेत्री सोनाली कुलकर्णी मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. नुकतीच मुंबईत या सिनेमाच्या फस्ट लूक लाँचच्या निमित्ताने एक जंगी पार्टी आयोजित करण्यात आली होती.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे, ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना दीदी, उषा नाडकर्णी, रोहिणी हट्टंगडी, जयवंत वाडकर, प्रसाद ओक, मंजिरी ओक, पुष्कर श्रोत्री, भरत जाधव, सिद्धार्थ जाधव, आदेश बांदेकर, सुचित्रा बांदेकर यांच्यासह मराठी सिनेइंडस्ट्रीतील अनेक कलाकारांनी उपस्थिती लावली होती. 8 मार्च रोजी आयोजित या पार्टीत जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने सिनेइंडस्ट्रीतील अनेक अभिनेत्रींचा सत्कार करण्यात आला.
'अगं बाई अरेच्चा' हा सिनेमा 2000 साली प्रदर्शित झालेल्या 'व्हॉट वुमन वॉन्ट्स' या मेल गिब्सन अभिनीत व नॅन्सी मेयर द्वारा दिग्दर्शित हॉलिवूड सिनेमावरून प्रेरणा घेऊन बनवण्यात आला होता. संजय नार्वेकर, दिलीप प्रभावळकर, रेखा कामत, भारती आचरेकर, सुहास जोशी, शुभांगी गोखले, रसिका जोशी, विजय चव्हाण यांच्या अभिनयाने सजलेल्या 'अगं बाई अरेच्चा' या सिनेमाला प्रेक्षकांनी पसंतीची पावती दिली होती.
केदार शिंदे यांनी 'अगं बाई अरेच्चा 2' हा सिनेमा यावर्षी 22 मे रोजी हा थिएटरमध्ये दाखल होणार आहे.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा 'अगं बाई अरेच्चा 2'च्या फस्ट लूक लाँच पार्टीची खास क्षणचित्रे...