(डावीकडून - पत्नी दीप्तीसोबत श्रेयस तळपदे, अमृता खानविलकर-जितेंद्र जोशी, सिद्धार्थ जाधव आणि अतुल कुलकर्णी)
निखिल महाजन दिग्दर्शित आणि दार मोशन पिक्चर्स, अॅफलूएन्स मुव्हीज, ब्ल्यू ड्रॉप एन्टरटेन्मेंट आणि आयएमई मोशन पिक्चर्सची निर्मिती असलेला 'बाजी' हा सिनेमा शुक्रवारी
बॉक्स ऑफिसवर दाखल झाला आहे. अभिनेता श्रेयस तळपदे, जितेंद्र जोशी आणि अभिनेत्री अमृता खानविलकर हे कलाकार सिनेमात मेन लीडमध्ये झळकले आहेत.
शुक्रवारी मुंबईतील फन रिपब्लिक येथे मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतील सेलिब्रिटींसाठी 'बाजी'चे खास स्क्रिनिंग ठेवण्यात आले होते. यावेळी अमृता खानविलकर ग्लॅमरस लूकमध्ये दिसली. तर सिनेमात खलनायकाची भूमिका साकारणारा अभिनेता जितेंद्र जोशी धोती-कुर्ता या पारंपरिक पोशाखात स्क्रिनिंगला पोहोचला होता. श्रेयस तळपदे ब्लॅक सूट-बूटमध्ये नेहमीप्रमाणेच डॅशिंग दिसला.
या स्क्रिनिंगला प्रसिद्ध दिग्दर्शक सुभाष घई, अभिनेता मकरंद देशपांडे यांच्यासह सिद्धार्थ जाधव, श्रेयस तळपदेची पत्नी दीप्ती तळपदे, संतोष जुवेकर, दिग्दर्शक निखिल महाजन आणि त्यांची पत्नी मृण्मयी महाजन, सचिन खेडकर आणि त्यांच्या पत्नी, अनिकेत विश्वासराव यांच्यासह अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती.
मराठीतील पहिला सुपरहीरो म्हणून 'बाजी'ला संबोधले जात आहे. बाजी, चिद्विलास आणि मार्कंड या तीन व्यक्तिरेखांभोवती 'बाजी' या सिनेमाचे कथानक गुंफण्यात आले असून समीक्षकांनी सिनेमाला चांगला प्रतिसाद दिला आहे.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा 'बाजी'च्या स्क्रिनिंगला पोहोचलेल्या सेलिब्रिटींची खास झलक...