आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Marathi Film Balkadu Release Today In Maharashtra

Friday Release: \'बाळकडू\'मध्ये घुमणार बाळासाहेबांची गर्जना, Pixमध्ये पाहा खास झलक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी पन्नास वर्षे महाराष्ट्रावर आणि मराठी माणसांवर अधिराज्य गाजवले. मराठी माणसाला कणा आहे व स्वाभिमानी बाणा आहे हे दाखविण्याच्या काम फक्त बाळासाहेबांनी केले. बाळासाहेब हेच एकमेव “मराठी मनाचे मानबिंदू” ठरले ते या मुळेच!
आज रिलीज झालेल्या ‘बाळकडू’ या मराठी सिनेमाद्वारे बाळासाहेब ठाकरे मराठी रसिक जनांसमोर येत आहेत. संजय राऊत प्रस्तुत ‘बाळकडू’मधून बाळासाहेबांची फक्त गर्जना नाही तर प्रत्येक्ष बाळासाहेबांना अनुभवता येणार आहे.
'बाळकडू' म्हणजे मुंबईतील सामान्य माणसाची कथा. त्याचा संघर्ष व त्या संघर्ष्यास लाभलेली बाळासाहेबांची प्रेरणा. कथा व आशय रोमांचित करणारे आहेत पण प्रत्यक्ष पडद्यावर ती अधिक रोमांचित करणारी ठरेल. पडद्यावर प्रत्यक्ष बाळासाहेबांनी साधलेला संवाद व त्यातून दिलेले विचारांचे बाळकडू थक्क करणारे आहे. प्रदीर्घ काळ बाळासाहेबांबरोबर राहिलेले शिवसेना नेते व सामनाचे कार्यकारी संपादक म्हणून परिचित असलेले संजय राऊत यांनी हा सिनेमा प्रदर्शित केला आहे, तर सिनेमाच्या निर्मात्या स्वप्ना पाटकर आहेत. अतुल काळे यांनी हा सिनेमा दिग्दर्शित केला आहे.
अभिनेता उमेश कामत, नेहा पेंडसे, हिंदीतील प्रथितयश कलावंत टिकू तलसानिया तसेच प्रसाद ओक, सुप्रिया पाठारे, पुष्कर श्रोत्री, जयवंत वाडकर, आनंद इंगळे, भालचंद्र कदम, महेश शेट्टी, रमेश वाणी, अतुल काळे, अभय राणे, संकेत कदम, अजय टिल्लू, गौरव मोरे आणि शरद पोंक्षे अशी प्रथितयश व नवोदित कलावंतांची साथ लाभली आहे.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि छायाचित्रांमधून पाहा सिनेमाची एक छोटीशी झलक...