आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

असे झाले मराठी फिल्ममध्ये सनी लिओनीच्या गाण्याचे शूटिंग, बघा \'बॉईज\'ची On Location झलक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
8 सप्टेंबर रोजी बॉक्स ऑफिसवर 'तुला कळणार नाही' आणि 'बॉईज' हे दोन मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आले. त्यापैकी 'बॉईज'ला प्रेक्षकांचा चांगला रिस्पॉन्स मिळाला. रिलीजच्या अवघ्या तीन दिवसांत या चित्रपटाने तब्बल 3 कोटी 72 लाखांचा गल्ला जमवला होता. तर‘तुला कळणार नाही’ने 1 कोटी 10 लाखांची कमाई केली होती. त्यामुळे ‘बॉइज’ने ‘तुला कळणार नाही’ला बॉक्स ऑफिसवर चांगलीच टक्कर दिल्याचे चित्र गेल्या आठवड्यांत बॉक्स ऑफिसवर बघायला मिळाले होते. अवधूत गुप्ते आपल्याला 'बॉईज' या सिनेमाद्वारे प्रथमच प्रस्तुतकर्ते म्हणून पाहायला मिळाले, तर अनेक यशस्वी चित्रपटांतून सहदिग्दर्शकाची जबाबदारी पेलणारे विशाल देवरुखकर यांनी प्रथमच दिग्दर्शक म्हणून मराठी चित्रपटात

'बॉईज'द्वारे आपले पदार्पण केले. पार्थ भालेराव, प्रतिक लाड आणि सुमंत शिंदे या कलाकारांच्या मुख्य भूमिका आहेत. या चित्रपटात बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री सनी लिओनी कुठं कुठं जायाचं हनीमूनला या गाण्यावर थिरकताना दिसली. सनी या चित्रपटाचे आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरली. सनीच्या अपिअरन्सचा चित्रपटाला मोठा फायदा झाला, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. 

या चित्रपटाचे ऑन लोकेशन फोटोज आज आम्ही तुम्हाला या पॅकेजमधून दाखवत आहोत. प्रसिद्ध फोटोग्राफर प्रवीण कांबळे यांच्या कॅमे-यात बॉईज चित्रपटाची ऑन लोकेशन झलक बंदिस्त झाली आहे. सनी लिओनी, पार्थ भालेराव, प्रतिक लाड, सुमंत शिंदे या कलाकारांचे शूटिंग करतानाचे बिहाइंड द सीन्स तुम्हाला या पॅकेजमध्ये बघता येतील. 

चला तर मग पाहुयात, कसा होता चित्रपटाच्या सेटवर कलाकारांचा अंदाज आणि सोबतच वाचा, काय आहे या चित्रपटाची कथा आणि बरंच काही... 
बातम्या आणखी आहेत...