Home | Bollywood | Marathi Cinekatta | Marathi Film Boys Success Party

Party Time :'बॉईज'चा आठवड्याभरात 8 कोटींहून अधिकचा गल्ला, पार्टीत झाली सिक्वेलची अकाउंसमेंट

दिव्य मराठी वेब टीम | Update - Sep 19, 2017, 01:16 PM IST

विशाल देवरुखकर दिग्दर्शित 'बॉईज' या चित्रपटाने रिलीजच्या पहिल्या आठवड्यात तब्बल आठ कोटी 40 लाखांची कमाई केली आहे.

 • Marathi Film Boys Success Party

  विशाल देवरुखकर दिग्दर्शित 'बॉईज' या चित्रपटाने रिलीजच्या पहिल्या आठवड्यात तब्बल आठ कोटी 40 लाखांची कमाई केली आहे. चित्रपटाला मिळालेले यश साजरे करण्यासाठी नुकतीच मुंबईत दणक्यात सक्सेस पार्टी पार पडली. या पार्टीत बॉईजच्या सिक्वेलची घोषणा करण्यात आली. 2019 मध्ये हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. किशोरवयीन मुलांच्या भावविश्वावर आधारित असलेल्या या सिनेमाला सिनेरसिकांनी दिलेल्या उदंड प्रतिसादानंतर 'बॉईज' च्या टीमने प्रेक्षकांसाठी 'लंपटझंपट'ची म्युजीकल ट्रीट देऊ केली आहे. सक्सेस पार्टीमध्ये सिनेमातील सर्व कलाकारांना आकर्षक सन्मानचिन्ह देत पुरस्कृत करण्यात आले, शिवाय फेसबुक लकी विनर ठरलेल्या विजेत्या स्पर्धकाला ई सायकलदेखील देण्यात आली.
  'बॉईज'च्या रिलीजनंतर आले 'लंपटझंपट' गाणे...
  खट्याळ 'बॉईज' वर्गाची धम्माल आणि मस्तीत रंगलेला हा सिनेमा, प्रसिद्धीचा उच्चांक गाठत असल्यामुळे, खास प्रेक्षकांसाठी सादर केलेले 'लंपटझंपट' हे गाणं, सिनेमा रिलीज झाल्यानंतर चित्रित करण्यात आले असून, सिनेमातील इतर गाण्यांप्रमाणे या गाण्यालादेखील प्रेक्षक पसंत करीत आहे. 'लंपटझंपट' या उडत्या लयीच्या गाण्याला दिग्विजय जोशी यांचा आवाज लाभला असून, मंगेश कांगणे लिखित हे गाणे अवधूत गुप्ते यांच्या संगीतदिग्दर्शकीय नजरेतून साकार झाले आहे. मराठीची बोल्ड आणि ग्लॅमरर्स अभिनेत्री स्मिता गोंदकरचा नखरेल अंदाज यात पाहायला मिळतो. या सिनेमाविषयी सांगताना प्रस्तुतकर्ते अवधूत गुप्ते भाऊक झाले होते. 'बॉईज' सिनेमाला सिनेरसिकांचे अमाप प्रेम मिळत असून, आमच्या यशात त्यांचा मोठा वाटा आहे. त्यामुळेच प्रेक्षकांना 'लंपटझंपट' या गाण्याद्वारे आम्ही रिटर्न गिफ्ट देत आहोत. आमचे हे गिफ्ट प्रेक्षकांना आवडेल अशी मी आशा व्यक्त करतो' असे अवधूत गुप्रे यांनी सांगितले.
  पार्टीत पोहोचले मराठी सेलेब्स...
  संजय जाधव, अंकुश चौधरी, अमितराज, संचित पाटील, आनंद इंगळे तसेच वैशाली सामंत, रीना अगरवाल या सिनेतारकांची मांदियाळीदेखील या पार्टीतील आकर्षणाचा विषय ठरला . शिवाय प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहिलेले अभिनेते सचिन पिळगावकर यांनी हा सिनेमा येत्या दोन दिवसात 10 कोटींचा आकडा पार करेल, अशी भविष्यवाणी करत सिनेमाला भरघोस शुभेच्छा दिल्या. सध्या या सिनेमाचे दोन आठवड्यांचे कलेक्शन पाहिले असता, मराठी प्रेक्षकवर्ग मोठ्याप्रमाणात या चित्रपटाकडे वळत असल्याचे लक्षात येईल.
  या सिनेमाने दुसऱ्या आठवड्यात 300 वरून 350 थिएटर्स आणि 2800 शोजवरून 4000 शोजवर बाजी मारली असून 8 सप्टेंबर रोजी प्रदर्शित झाल्यापासून ते रविवार म्हणजे 17 सप्टेंबरपर्यत 'बॉईज'ने 8 करोड 40 हजारांचा गल्ला कमावला आहे. तीन मित्रांची न्यारी दुनिया आणि त्यांच्या विनोदाने परिपूर्ण असलेल्या या चित्रपटात संतोष जुवेकर, झाकीर हुसेन, वैभव मांगले, शिल्पा तुळसकर, शर्वरी जेमिनेस, रितिका शोत्री यांच्यादेखील भूमिका आहेत. पार्थ भालेराव, सुमंत शिंदे आणि प्रतिक लाड यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

  पाहुयात, बॉईजच्या सक्सेस पार्टीची खास झलक छायाचित्रांमध्ये..

 • Marathi Film Boys Success Party
 • Marathi Film Boys Success Party
 • Marathi Film Boys Success Party
 • Marathi Film Boys Success Party
 • Marathi Film Boys Success Party
 • Marathi Film Boys Success Party
 • Marathi Film Boys Success Party
 • Marathi Film Boys Success Party
 • Marathi Film Boys Success Party
 • Marathi Film Boys Success Party
 • Marathi Film Boys Success Party
 • Marathi Film Boys Success Party

Trending