आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वैभव तत्ववादी बनला ‘चीटर’, चीटर बनून सगळ्यांना करणार एप्रिल फुल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
‘रात्र आरंभ’ ‘एनकाऊंटर’, ‘यही है जिंदगी’, ‘एक होती वादी', ‘रामचंद्र पुरुषोत्तम जोशी’ असे सिनेमे दिग्दर्शित करणा-या अजय फणसेकरांच्या आगामी ‘चीटर’ ह्या चित्रपटात अभिनेता वैभव तत्ववादी मुख्य भुमिकेत आहे. चित्रपटाचे फस्ट लूक पोस्टर नुकतेच फिल्ममेकर्सनी अनविले केले आहे. सिनेमा १ एप्रिलला म्हणजेच चीट करण्याच्या दिवशीच रिलीज होणार आहे.
वैभव तत्ववादी, हृषीकेश जोशी, आसावरी जोशी, सुहास जोशी आणि पूजा सावंत स्टारर हा सिनेमा एक कॉमेडी सिनेमा आहे. एकिकडे लेदर जॅकेट आणि स्टाइलिश सनग्लासेस घातलेला, पण त्यासोबतच हातात आणि गळ्यात रूद्राक्षाच्या माळा, कपाळावर गंध आणि खांद्यावर उपरणं घेतलेला वैभवचा लूक पाहूनच तो सिनेमात ‘चीट’ करणार हे स्पष्ट होतंय.
ह्या विषयी दिग्दर्शक अजय फणसेकर सांगतात, “सिनेमाच्या नावावारून आणि वैभवच्या लूकवरून तुमच्या लक्षात आलं असेलच की, हा एक धमाल कॉमेडी सिनेमा असणार आहे. हा तीन तास मनोरंजन करणारा सिनेमा आहे. ही सिच्युएशनल कॉमेडी फिल्म आहे. फिल्ममध्ये बरेच VFX दिसतील. सिनेमाचं शुटिंग आम्ही मॉरिशसला केलंय. वैभवचे सिनेमात बरेच लूक आहेत. जे आता सिनेमा रिलीज होईपर्यंत हळूहळू तुम्हांला दिसतीलच. आणि बहूरूपी बनून वैभव नक्की कसा चीट करेल, ते ही तुम्हांला सिनेमात दिसेलच. सोनु निगमने ह्या सिनेमात दोन गाणी गायलीयत. तीही लवकरच लोकांच्यासमोर येतील.”
पुढील स्लाइडमध्ये पाहा, चीटर सिनेमाचे फस्ट लूक पोस्टर