Home | Bollywood | Marathi Cinekatta | Marathi Film Chi Va Chi Sau Ka Special Screening

PICS: 'चि. व चि. सौ. कां.'च्या ग्रॅण्ड प्रीमिअरला एकत्र आले सेलेब्स, ग्लॅमरस लूकमध्ये दिसली सई

दिव्य मराठी वेब टीम | Update - May 20, 2017, 06:15 PM IST

राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक परेश मोकाशी आणि लेखिका मधुगंधा कुलकर्णी यांचा नवा सिनेमा 'चि. व चि. सौ. कां.' 19 मे रोजी थिएटरमध्ये दाखल झाला आहे.

 • Marathi Film Chi Va Chi Sau Ka Special Screening
  एन्टरटेन्मेंट डेस्कः राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक परेश मोकाशी आणि लेखिका मधुगंधा कुलकर्णी यांचा नवा सिनेमा 'चि. व चि. सौ. कां.' 19 मे रोजी थिएटरमध्ये दाखल झाला आहे. नुकताच या चित्रपटाचा ग्रॅण्ड प्रीमिअर सोहळा मुंबईत पार पडला. प्रीमिअरला चित्रपटाच्या स्टारकास्टसह मराठी इंडस्ट्रीतील अनेक कलाकारांनी उपस्थिती लावली होती. सई ताम्हणकर, अमृता सुभाष, ज्योती सुभाष, शशांक केतकर, गिरीजा ओक-गोडबोले, जितेंद्र जोशी, सुकन्या मोने, अमेय वाघ, पर्ण पेठेसह अनेक सेलेब्स यावेळी उपस्थित होते.
  परेश मोकाशी दिग्दर्शित या सिनेमात ललित प्रभाकर आणि मृण्मयी गोडबोले ही जोडी पहिल्यांदाच ऑन स्क्रिन एकत्र आली आहे. झी मराठीवरील ‘जुळून येती रेशीमगाठी’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेला ललित प्रभाकर याचा हा पदार्पणातला चित्रपट आहे.
  ही आहे चित्रपटाची कथा...
  सत्यप्रकाश आणि सावित्रीच्या नात्यांचे उलगडत जाणारे विविध पदर हे अतिशय खुमासदार पद्धतीने सांगणारी गोष्ट म्हणजे हा चित्रपट आहे. चित्रपटाची कथा आहे सत्यप्रकाश आणि सावित्री यांची. सावित्री ही प्राण्यांची डॉक्टर व पराकोटीची प्राणीप्रेमी तर सत्यप्रकाश हा इलेक्ट्रीकल इंजिनियर व टोकाचा पर्यावरण प्रेमी. दोघेही विचारांवर ठाम व कामात मग्न. घरच्यांच्या आग्रहाला बळी पडून स्थळ पाहण्याच्या कार्यक्रमाला दोघेही मान्यता देतात व एकमेकांना पाहतात देखील. त्या दोघांच्या ओळखीचे एक जोडपे नुकतेच वेगळे झालेले असते. प्रेमात आकंठ बुडालेली ती जोडी महिन्याभरातच एकमेकांना वैतागून तुटलेली असते. त्यापासून धडा घेऊन सावित्री - सत्यप्रकाश एक विचित्र निर्णय घेतात आणि त्यांचे कुटुंबिय व मित्रांची एकच भंबेरी उडते. त्यांचा हा निर्णय काय असतो, दोघांचे लग्न होते का... या प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी प्रेक्षकांना हा सिनेमा थिएटरमध्ये जाऊन बघायला हवा.

  कसा रंगला या चित्रपटाचा ग्रॅण्ड प्रीमिअर, बघा पुढील स्लाईड्सवर...

Trending