आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हे आहेत \'Classmates\', पाहा फस्ट लूक लाँच पार्टीतील मराठी सेलेब्सची धमाल-मस्ती

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फस्ट लूक लाँचवेळी क्लिक झालेली मराठी सेलेब्सची छायाचित्रे)

आदित्य सरपोतदार दिग्दर्शित आगामी `क्लासमेट’ या सिनेमाच्या फस्ट लूक लाँचची जंगी पार्टी अलीकडेच मुंबईत आयोजित करण्यात आली होती. मुंबईतील वांद्रयाच्या पबमध्ये आयोजित या धमाल पार्टीत सिनेमाचा टीझर रिलीज करण्यात आला आहे. संगीतकार अमितराजच्या दमदार लाइव्ह परफॉर्मन्सने या पार्टीत रंग भरले. 'तेरी मेरी यारीयाँ...' या गाण्याने सा-यांनाच ठेका धरायला लावला. या गाण्याला हर्ष वावरेने स्वरसाज चढवला आहे. 'क्लासमेट्स'च्या टीमसोबत आणि प्रमुख भूमिकेत आपल्यासमोर येणा-या सिद्धार्थ चांदेकरवर हे गाणे चित्रीत करण्यात आले आहे. विशेष म्हणजे येत्या शुक्रवारी 'तेरी मेरी यारीयाँ...' या गाण्याचा व्हिडिओ रिलीज करण्यात येणार आहे.
प्रेम, मैत्री, जल्लोष, थरार संगीत असा संगम असलेल्या या सिनेमात अंकुश चौधरी, सई ताम्हणकर, सोनाली कुलकर्णी, सुशांत शेलार, सचित पाटील, सिद्धार्थ चांदेकर, सुयश टिळक, पल्लवी पाटील मेन लीडमध्ये आहेत. शिवाय संजय मोने, किशोरी शहाणे आणि रमेश देव यांच्या अभिनयाची मेजवानी सोबतीला आहे. 2006मध्ये आलेल्या 'क्लासमेट' या मल्याळम सिनेमाचा हा मराठी रिमेक आहे.
या सिनेमाचे गीतकार गुरू ठाकुर असून अमित राज याचे संगीतकार आहेत. 1994चा कालावधी या सिनेमातून दाखविण्यात येणार आहे. त्यामुळे सिनेमाचे संगीत, वेशभूषा या सगळ्याबाबतीत एक वेगळेपण सिनेमातून पाहायला मिळणार आहे. व्हिडिओ पॅलेसचे नानूभाई आणि सुरेश पै यांनी या सिनेमाची निर्मिती केली आहे.
दोस्ती आणि प्रेमाची अनोखी गाथा सांगणारा हा सिनेमा पुढील वर्षी 16 जानेवारी 2015 रोजी थिएटरमध्ये दाखल होणार आहे.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा 'क्लासमेट्स'च्या फस्ट लूक लाँच पार्टीतील सेलेब्रिटींची धमालमस्ती... या पार्टीत सेलिब्रिटींचा सेल्फी मूड बघायला मिळाला.