आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Marathi Film \'court\' Aamir Khan And Kiran Rao Arrived In Screening

राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या \'कोर्ट\'च्या स्क्रिनिंगला पत्नीसोबत पोहोचला आमिर, सोहा-कुणालही दिसले

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(पत्नी किरण रावसोबत आमिर खान, पती कुणाल खेमुसोबत सोहा अली खान)
मुंबईः गुरुवारी रात्री बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान पत्नी किरण रावसोबत 'कोर्ट' या मराठी सिनेमाच्या स्क्रिनिंगमध्ये सहभागी झाला होता. याशिवाय अभिनेत्री सोहा अली खान आणि तिचा पती कुणाल खेमुसुद्धा या स्क्रिनिंगमध्ये पोहोचले होते. 'कोर्ट' या सिनेमाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा 62 वा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे. येत्या 17 एप्रिल रोजी हा सिनेमा थिएटरमध्ये दाखल होणार आहे.
'कोर्ट' हा मराठी सिनेमा मागील बऱ्याच दिवसांपासून आंतरराष्ट्रीय पातळीवर गाजत आहे. 20 देशांची भ्रमंती करत 20 सिनेमा महोत्सवांमध्ये 17 पुरस्कारांवर आपलं नाव कोरत 'कोर्ट' ने एक विक्रम प्रस्थापित केला आहे. आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या कलाकारतंत्रज्ञासह समीक्षकांनीही कोर्ट वर स्तुतीसुमनांची उधळण केली आहे. निर्माते विवेक गोम्बर यांच्या झू एन्टरटेन्मेट प्रा. लि. ची निर्मिती असलेला 'कोर्ट' हा सिनेमा चैतन्य ताम्हाणे यांनी दिग्दर्शित केला आहे.
हा सिनेमा मराठीसोबतच हिंदी, गुजराती आणि इंग्रजीतही बनवण्यात आला आहे.
पुढे पाहा, स्क्रिनिंगला पोहोचलेल्या सेलेब्सची छायाचित्रे...