आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वप्नील-सई स्टारर \'दुनियादारी\'च्या रिलीजला दोन वर्षे पूर्ण, वाचा धमाल डायलॉग्स

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मराठी सिनेसृष्टीत दर्जेदार कलाकृती तयार होत नाहीत, मराठी सिनेमा तरुणाईला आपल्याकडे वळवण्यात अपयशी ठरतो, मराठी प्रेक्षकच मराठी सिनेमांकडे पाठ फिरवतात अशी खंत नेहमीच व्यक्त केली जात होती. मात्र 'दुनियादारी' सिनेमाने ही प्रतिमा पुसून काढली. दोन वर्षांपूर्वी 19 जुलै 2013 रोजी हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर दाखल झाला आणि बघता बघता या सिनेमाने मराठी सिनेसृष्टीत एक नवीन इतिहास रचला. या सिनेमाला रिलीज होऊन नुकतीच दोन वर्षे पूर्ण झाली आहेत.
सत्तरच्या दशकात तरुणाईच्या मनावर आपला खास ठसा उमटवणा-या सुहास शिरवळकर यांच्या दुनियादारी कादंबरीवर आधारित सिनेमाने प्रेक्षकांना चांगलेच वेड लावले होते. अगदी रिलीजपासूनच या सिनेमाला हाऊसफूलचे बोर्ड लागले होते.
काळ बदलला, पिढ्या बदलल्या, तरी तरुणाईची दुनियादारी तीच आहे. आपल्या मैत्रीसाठी जीवाचं रान करणारे जिगरी दोस्त... कट्यावरची धमाल, टपरीवरची कटींग, कॉलेजमधले मंतरलेले दिवस आणि कॉलेजमधून बाहेर पडल्यावरही कालातीत टिकून राहिलेली मैत्री.. या सगळ्याचा जिवंत अनुभव घेऊन अवतरलेली ही सदाबहार दुनियादारी प्रेक्षकांनी आपली केली. प्रत्येक पिढीतील तरुणांना वेड लावणारी ही दुनियादारी त्याच दशकातील लुकसह, रेट्रो स्टाईलमध्ये रुपेरी पडद्यावर अवतरली. त्यामुळे तरुणांनीच नव्हे तर सर्व वयोगटातल्या तमाम रसिकांनी या सिनेमाला आपली खास पसंती दर्शवली.
या सिनेमाला दोन वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आम्ही खास तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत 'दुनियादारी'मधील गाजलेले डायलॉग्स...