आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Marathi Film Elizabeth Ekadashi Special Screening For Marathi Celebrities

Pix: 'एलिझाबेथ एकादशी'च्या स्पेशल स्क्रिनिंगला जमली मराठी Celebsची मांदियाळी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
('एलिझाबेथ एकादशी'च्या स्क्रिनिंगला जमलेले सेलिब्रिटी)

मुंबईः परेश मोकाशी दिग्दर्शित आणि बहुचर्चित 'एलिझाबेथ एकादशी' हा सिनेमा आज थिएटरमध्ये दाखल झाला आहे. नावावरुनच काहीतरी वेगळेपण असलेल्या या सिनेमाविषयी रिलीजपूर्वीच खूप उत्सुकता निर्माण झाली होती. प्रेक्षकांप्रमाणेच मराठी सेलिब्रिटींमध्येही हीच उत्सुकता दिसून आली. बॉक्स ऑफिसवर हा सिनेमा झळकण्यापूर्वी मुंबईत गुरुवारी मराठी सेलिब्रिटींसाठी याचे स्पेशल स्क्रिनिंग आयोजित करण्यात आले होते. दिग्दर्शक परेश मोकाशी आणि त्यांच्या पत्नी मधुगंधा कुलकर्णी यांना शुभेच्छा देण्यासाठी अनेक कलाकारांनी या स्क्रिनिंगला आवर्जुन हजेरी लावली आणि सिनेमाचे व कलाकारांचे तोंडभरुन कौतुक केले.
अभिनेत्री मुक्ता बर्वे म्हणाली, ''एलिझाबेथ एकादशी बघितला. एक फार सहज सुंदर आणि जगण्याविषयी खूप महत्वाचं काहीतरी सांगणारा सिनेमा. बघायलाच हवा असा सिनेमा. सर्वांग सुंदर सिनेमा. लेखिका मधुगंधा कुलकर्णी, दिग्दर्शक परेश मोकाशी, पडद्यामागचे-पुढचे सर्व कलाकार, प्रस्तुतकर्ते झी मराठी सगळ्यांच भरभरून अभिनंदन! आणि एक प्रेक्षक म्हणून मनापासून आभार!" तर अभिनेते जयवंत वाडकर यांनीही निर्मळ, स्वछ सिनेमा म्हणत सिनेमाच्या संपुर्ण टीमचे कौतुक केले.
या स्क्रिनिंगला मुक्ता बर्वे आणि जयवंत वाडकर यांच्यासह अभिनेते सचिन खेडेकर आणि त्यांच्या पत्नी, पुष्कर श्रोत्री आणि त्यांच्या पत्नी, अमोल गुप्ते, प्रमोद वेलणकर, अभिजीत साटम, मधुरा वेलणकर-साटम, पल्लवी सुभाष, नीना कुलकर्णी, विभावरी देशपांडे, नेहा जोशी, सोनाली कुलकर्णी, रोहन गुजर यांनी विशेष हजेरी लावली होती. यावेळी या कलाकारांनी सिनेमातील बालकलाकारांसह आवर्जुन फोटो काढून घेतले.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा 'एलिझाबेथ एकादशी'च्या स्क्रिनिंगवेळी क्लिक झालेली मराठी सेलिब्रिटींची ही खास छायाचित्रे...