आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PIX: अमेय वाघ दोन मित्रांसोबत मिळून का म्हणतोय 'घंटा...', पार्टीत उलगडली ही खास गोष्ट

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
'दिल दोस्ती दुनियादारी' या मालिकेतून प्रसिद्धीझोतात आलेला अभिनेता अमेय वाघची एक नवीन भानगड नुकतीच उघडकीस आली आहे. थांबा थांबा जास्त तर्क वितर्क लावू नका... ही भानगड म्हणजे तो एखाद्या कॉन्ट्रोव्हर्सी वैगेरे काही अडकलेला नाहीये. तर आम्ही बोलतोय त्याच्या नवीन सिनेमाविषयी ज्याचे नाव आहे 'घंटा'. बरोबच अमेयचा हा नवीन सिनेमा असून यामध्ये सक्षम कुलकर्णी, आरोह वेलणकर, अनुजा साठे, जयवंत वाडकर, शिवानी सुर्वे, किशोर कदम, पुष्कर श्रोत्री, भाऊ कदम ही मंडळी त्याला साथ देतेय. अलीकडेच मुंबईत एका पार्टीत या सिनेमाचा ट्रेलर लाँच करण्यात आला. यावेळी महेश मांजरेकर, महेश कोठारे, संतोष जुवेकर, सौरभ गोखले या सेलिब्रिटींसह मराठी इंडस्ट्रीतील अनेक कलाकार उपस्थित होते.
घंटा आहे कॉमेडी फिल्म...
शैलेश शंकर काळे दिग्दर्शित या सिनेमात अमेय वाघ, आरोह वेलणकर आणि सक्षम कुलकर्णी ही यंग बिग्रेड एकत्र आली आहे म्हटल्यावर काय धमाल उडेल याचा विचार तुम्हीच करा. तिघेही अफलातून तरूण कलाकार असून सिनेमातही काहीतरी अफलातून बघायला मिळेल अशी आशा आहे. येत्या 14 ऑक्टोबरला हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन बघा, 'घंटा' या सिनेमाच्या ट्रेलर लाँच सोहळ्याची खास झलक... आणि सोबतच बघा 'घंटा' या सिनेमाचा पोटधरुन हसायला भाग पाडणारा ट्रेलर...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...