आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हृदयस्पर्शी आहे मुक्ता-सुबोध स्टारर \'हृदयांतर\'चा Trailer, हृतिक रोशनची दिसली झलक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईः विक्रम फडणीस दिग्दर्शित ‘हृदयांतर’ या बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित सिनेमाचा ट्रेलर रविवारी लाँच करण्यात आला आहे. सुबोध भावे आणि मुक्ता बर्वे यांच्या मुख्य भूमिका या सिनेमात आहेत. हृदयांतरचा ट्रेलर या सिनेमाबद्दलची उत्सुकता वाढवणारा आहे. बॉलिवूडचा सुपरस्टार हृतिक रोशनची एक छोटीशी झलक ट्रेलरच्या शेवटी बघायला मिळतेय. या सिनेमातून हृतिक पहिल्यांदाच मराठी सिनेमात पाहुणा कलाकार म्हणून काम करत आहे.  

काय आहे हृदयांतरची वनलाईन.. 
हृदयांतर या सिनेमाची कथा शेखर जोशी (सुबोध भावे), त्याची पत्नी समायरा जोशी (मुक्ता बर्वे) आणि त्यांच्या दोन मुली नित्या आणि नायशा यांच्याभोवती गुंफण्यात आली आहे. अरेंज्ड मॅरेज झालेल्या शेखर आणि समायरा यांच्या आयुष्यात असेही चढउतार येतात, की समायरा शेखरपासून घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतात. पण या निर्णयानंतर दोघांच्या आयुष्यात एक वेगळं वळण येतं. त्यांच्या १० वर्षांच्या मुलीला, नित्याला कर्करोग झाल्याचे स्पष्ट होते आणि त्या दोघांचं जगच बदलून जाते. पुढे त्यांच्या आयुष्यात काय होतं, हे हृदयांतरमध्ये दाखवण्यात आलंय. 

‘हृदयांतर’मुळे ‘आई’पण काय असते ते कळले...
या सिनेमात मुक्ता दोन मुलींच्या आईच्या भूमिकेत आहे. याविषयी मुक्ता म्हणते, “गेल्यावर्षी आलेल्या ‘वायझेड’ सिनेमात जरी मी आईच्या छोट्याशा भूमिकेतून दिसले असले, तरीही त्यात आईपण अनुभवता आलं नव्हतं. ती कशीबशी अगदी पाच मिनिटांचीच भूमिका होती. मला ख-या अर्थाने आईपण समजून ते व्यक्त करण्याची संधी ‘हृदयांतर’मधल्या समायरा जोशी ह्या भूमिकेने दिली. माझ्या आईने आजपर्यंत माझ्यासाठी नक्की किती केलं, आणि किती सोसलं त्याची जाणीव मला या भूमिकेमूळे झाली.

नऊ वर्षांनंतर मुक्ता आणि सुबोध एकत्र... 
हृदयांतरच्या निमित्ताने मुक्ता आणि सुबोध तब्बल नऊ वर्षांनंतर एकत्र काम करत आहेत. याआधी हे दोघे ‘एक डाव धोबीपछाड’ या सिनेमात एकत्र दिसले होते.
 
यंग बेरी एन्टरटेन्मेट, इम्तियाज खत्री आणि विक्रम फडणीस प्रॉडक्शन निर्मित आणि विक्रम फडणीस दिग्दर्शित ‘हृदयांतर’ 7 जुलै 2017 ला चित्रपटगृहात झळकेल.
 
पुढच्या स्लाईड्सवर बघा, 'हृदयांतर'च्या ट्रेलरमधील निवडक फोटोज आणि पाचव्या स्लाईडवरचा व्हिडिओ बघायला विसरु नका... 
बातम्या आणखी आहेत...