आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठीतले A-Listers आले, ‘तू हि रे’च्या Music Launchला, पाहा, सई-तेजस्विनीचा ग्लॅमरस अंदाज

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दिग्दर्शक संजय जाधव आपले चित्रपट जेवढे लॅव्हिश बनवायचा प्रयत्न करतो, तेवढेच आपल्या प्रत्येक चित्रपटाचे म्युझिक लाँचही मराठीतले सर्वात लॅव्हिश म्युझिक लाँच व्हावे, यावरही भर देतो. त्यामुळेच तर संजय जाधवच्या ‘तू हि रे’ चित्रपटाच्या म्युझिक लाँचला मराठीतले बरेच ए-लिस्टर सेलेब्स दिसले.
सचिन पिळगांवकर, गजेंद्र अहिरे, सुकन्या कुलकर्णी, अनिकेत विश्वासराव, उर्मिला कानेटकर, आदिनाथ कोठारे, गौरी नलावडे, मृणाल कुलकर्णी, अंकुश चौधरी, पुष्कराज चिरपुटकर, सुयश टिळक, स्वानंदी टिकेकर, अमेय वाघ, सखी गोखले, सुव्रत जोशी, आदिती सारंगधर, सतिश राजवाडे, संतोष जुवेकर, मानसी नाईक, नागेश भोसले, पुष्कर श्रोत्री, कश्मिरा कुलकर्णी, प्रिया बापट, निशीकांत कामत, सचित पाटील, उपेंद्र लिमये असे मराठी फिल्म इंडस्ट्रीतले बरेच Who’s Who ‘तू हि रे’च्या म्युझिक लाँचला आले होते.
‘तू हि रे’च्या म्युझिक लाँचची थीम होती, पिंक एन्ड व्हाइट. Girls in Pink आणि Men’s in White. त्यामुळे ‘तू हि रे’ची संपूर्ण स्टारकास्ट गुलाबी आणि पांढ-या रंगात दिसत होती. म्युझिक लाँच सचिन पिळगांवकर ह्यांच्या हस्ते झालं. तर म्युझिक लाँचवर रोमॅंटिक सूरांची संगीतमय जादू उपस्थित गायकांनी केली होती.
संगीत सोहळा रंगला तो, स्टारकास्टच्या हास्यविनोदात. एकमेकांची टेर खेचत, मस्ती करत चाललेल्या ह्या संगीत सोहळ्यात हर्षदा खानविलकरने गुरू ठाकुरची दृष्ट काढली, तेव्हा संपूर्ण सभागृहात एकच हशा पिकला.
(सर्व फोटो- प्रदिप चव्हाण)
पुढील स्लाइडमध्ये पाहा, म्युझिक लाँचमध्ये आले कोण-कोण सेलेब्स ?