आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'अॅटमगिरी\'चा नवीन टीजर OUT, \'फँड्री\'च्या राजेश्वरी खरातसोबत झळकणार हा नवा चेहरा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मराठी सिनेसृष्टीत हल्ली नवीन विषय सिनेमात हाताळताना दिसतात. नवीन विषय, नवीन कलाकार आदी गोष्टींसाठी प्रेक्षक पण आतुर असतात. अशीच उत्सुकता वाढली आहे आगामी 'अॅटमगिरी' या सिनेमाविषयी.. या सिनेमाचे पोस्टर रिलीज झाल्यापासून सिनेमाची कथा, संकल्पना नक्कीच वेगळी असेल, असे दिसून येत आहे. या सिनेमातून 'फँड्री' या सिनेमातून प्रसिद्धीझोतात आलेली अभिनेत्री राजेश्वरी खरात आणि राष्ट्रीय पुरस्कारल विजेता अभिनेता हंसराज जगताप मेन लीडमध्ये असणार आहेत. या दोघांसोबत एक नवा चेहरा मोठ्या पडद्यावर झळकणारेय. या अभिनेत्रीचे नाव आहे धनश्री मेश्राम.
राजेश्वरी खरातनंतर आता धनश्रीला इंट्रोड्युस करणारा 'अॅटमगिरी'चा दुसरा टीजर रिलीज करण्यात आला आहे. अविराज प्रॉडक्शन आणि ए.आर.व्ही. प्रॉडक्शन निर्मित ‘अॅटमगिरी’ या चित्रपटाचे दिग्दर्शन मंगेश शेंडगे सह प्रदिप तोंगे यांनी केले आहे. राजेश्वरी खरात, हंसराज जगताप, धनश्री मेश्राम यांच्यासह अमित तावरे आणि राहुल पुणे या कलाकारांच्या महत्त्वपूर्ण भूमिका या सिनेमात आहेत. अद्याप सिनेमाची रिलीज डेट निश्चित झालेली नाही. मात्र टीजर बघता, सिनेमाविषयीची उत्सुकता नक्कीच वाढली, असे म्हणणे वावगे ठरणार नाही.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन बघा, 'अॅटमगिरी'च्या नुकत्याच रिलीज झालेल्या टीजरसोबत यापूर्वी रिलीज झालेले टीजर आणि सिनेमाच्या पोस्टरची खास झलक...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...