आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Marathi Film Janiva On Aruna Shanbag Released On 31st July 2015

70 MM वर जिवंत होणार अरुणा शानबागची कहाणी, जाणून घ्या या सिनेमाविषयी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जाणिवा सिनेमात आसावरी पाटील या भूमिकेत अभिनेत्री गौरी कोंगे, इनसेटमध्ये अरुणा शानबाग - Divya Marathi
जाणिवा सिनेमात आसावरी पाटील या भूमिकेत अभिनेत्री गौरी कोंगे, इनसेटमध्ये अरुणा शानबाग

एंजेल प्रोडक्शन आणि ब्लू ऑय प्रोडक्शनचा ‘जाणिवा’ हा मराठी सिनेमा येत्या 31 जुलै रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे. निर्माता मिलिंद विष्णु, अरविंद कुमार, रेश्मा विष्णु , सरमन जैन यांनी सादर केलेल्या या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे राजेश रणशिंगे यांनी. या सिनेमाचे वैशिष्ट म्हणजे स्वर्गीय अरुणा शानबाग हिच्या दुर्दैवी कथेपासून प्रेरित अशी भूमिका मोठ्या पडद्यावर साकारण्यात आली आहे. आसावरी पाटील हे या व्यक्तिरेखेचे नाव असून ही भूमिका अभिनेत्री गौरी कोंगे हिने साकारली आहे.
या सिनेमाची कथा कशी सुचली याविषयी राजेश रणशिंगे सांगतात, ''एक दिवस मी गाडीतून जात असताना एफएम चॅनेल ऐकत होतो. रेडिओ जॉकीने अरुणा शानबागची बातमी सांगितली आणि त्यावर खूप वेळ त्या जॉकीने चांगली मांडणी करत अरुणाची वेदना मांडली. ते ऐकत असताना मला जाणवले की, अरुणाची कथा 42 वर्षांपूर्वीची आहे. मात्र, त्यावेळीही नागरिकांच्या संवेदना जाग्या नव्हत्या. आजही आपण जेव्हा बाहेर बघतो तेव्हा मानवी जाणिवाच संपल्याचे हृदयद्रावक प्रसंग दररोज दिसतात. तेव्हा माणुसकी संपली का असा प्रश्न मनात उभा राहतो आणि हाच प्रश्न घेऊन मी जाणिवाची निर्मिती केली.''
या सिनेमाची कथा पाच तरुणांच्या अवती-भोवती फिरते. हे पाच मित्र एका ग्रुप बँडच्या आधारे, समाजामध्ये गाण्यांच्या माध्यमातून जागरुकता निर्माण करण्याचे कार्य करत असतात व सामाजिक कार्य करण्यासाठी फंड जमा करतात. निर्मात्यांच्या मते, चित्रपटात एक रोमांच आहे. समीर व त्यांच्या मित्रांना जेव्हा आसावरी पाटीलबद्दल घडलेली घटना समजते, तेव्हा त्यांच्या जीवनात एक प्रकारचे वादळ निर्माण होते. वेगळ्या कथानकाचा हा सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरेल अशी निर्मात्यांना खात्री आहे.
या सिनेमात अभिनेते-दिग्दर्शक महेश मांजरेकर यांचा मुलगा सत्या मांजरेकर महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकत आहे. याशिवाय वैभवी शांडिल्य, अनुराधा मुखर्जी, देवदत्त दानी, संकेत अग्रवाल, किरण करमरकर, रेणुका शहाणे, अतुल परचुरे, इंदिरा कृष्णन, उषा नाडकर्णी, किशोर कदम हे कलाकार आहेत. तर महेश मांजरेकर स्पेशल अपिअरन्समध्ये झळकणार आहे.
ही भूमिका साकारण्यासाठी गौरीला बरीच मेहनत घ्यावी लागली आहे. यासाठी तिने अरुणा शानबाग यांची छायाचित्रे आणि व्हिडिओ बरेच दिवस पाहिला.

पुढील स्लाईड्समध्ये पाहा, 'जाणिवा'मधील गौरीची छायाचित्रे...